• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

१०५ जणांचे नेते असलेल्या फडणवीसांचे ४० जणांनी मातेरे केले, आता कानच काय, फडणवीसांचे पोट, छातीही दुखेल!

– शिवसेना नेते खा. संजय राऊत यांचा देवेंद्र फडणीवासांना जोरदार चिमटा!

Admin by Admin
June 14, 2023
in मंत्रालय, राजकीय
1 min read
0
१०५ जणांचे नेते असलेल्या फडणवीसांचे ४० जणांनी मातेरे केले, आता कानच काय, फडणवीसांचे पोट, छातीही दुखेल!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मुंबई (नयना चाळके) – १०५ जणांचे नेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे शिंदे गटाच्या ४० जणांनी मातेरे केले आहे. त्यामुळे त्यांचे कानदुखीचे कारण खरे असू शकेल. या जाहिरातीमुळे फडणवीसांचे कानच काय, पोट, छातीतही दुखू शकते, असा खोचक टोला शिवसेना (ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना लगावला.

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या ‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या जाहिरातीचे राजकीय साईड इफेक्ट्स आजही दिसून आले. काल कोल्हापूर दौरा रद्द केल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे जाहीर कार्यक्रम आजही टाळले आहेत. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेसच्या नेत्यांनीदेखील या जाहिरातीवरून फडणवीस व भाजपला लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिंदे यांना फडणवीस यांच्यासमोर खडसावत, वादग्रस्त मंत्र्यांचे राजीनामे घेण्याचे आदेश दिल्यानंतर शिंदे अस्वस्थ असून, भाजपवर दबाव निर्माण करण्यासाठी दररोज या पानभर जाहिरातींचा रतीब घातला जात आहे, अशी माहिती राजकीय सूत्राने दिली आहे.

‘देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’, या शिंदे गटाच्या जाहिरातीमुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कमालीचे नाराज झाल्याची चर्चा आहे. त्यामुळेच कानदुखीचे कारण देत त्यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोल्हापूरला जाणे टाळले, अशीही चर्चा आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना टोले लगावत शिंदे गटावर जोरदार टीका केली.

खा. राऊत म्हणाले, की जाहिरात आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा कान दुखत आहे. त्यांना कानदुखीचे कारण खरे आहे. जे वारे सध्या महाराष्ट्रात चालू आहे, ते वारे जर कोणाच्या कानात शिरले, तर कोणाचाही कान दुखू शकतो. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची प्रकृती समजून घेतली पाहिजे. शिंदे सरकारला हार्ट अटॅकही येऊ शकतो. दरम्यान, काल जाहिरातीवरून वादंग निर्माण झाल्याने आज शिंदे गटाने पुन्हा सुधारित जाहिरात दिली. त्यात देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब ठाकरे यांना स्थान देण्यात आले. त्यावर संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीसांच्या नाराजीमुळेच नवीन जाहिरात देण्यात आली आहे. पडद्यामागे काय घडले हे मला माहिती आहे. मात्र, जो बूंद से गई, वो हौद से नही आती. कालच्या जाहिरातीमुळे एकनाथ शिंदेंच्या मनात काय आहे, हे स्पष्ट झाले. काल फडणवीसांनी खडसावल्यामुळेच आज नवीन चित्र दिसले. मात्र, प्रत्यक्षात शिंदे गट व भाजपात सर्व आलबेल नाही, हे स्पष्ट झाले आहे. येत्या एक, दोन महिन्यात हे सरकार पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल, असा दावाही संजय राऊतांनी केला.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आपले सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले असल्याची माहिती सूत्राने दिली आहे. फडणवीस यांचे आज बाहेरदेखील दौरे होते. पण डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ते मोठ्या सभा आणि विमान प्रवास टाळत आहेत. मोदी अ‍ॅट-९ च्या कार्यक्रमामुळे एसटी अमृतमहोत्सवाचा कार्यक्रम भाग न घेतल्याची माहिती मिळत आहे. तसेच आजची अकोला सभा आणि उद्याच्या धाराशिव येथील सभेलादेखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार नाहीत, असे सूत्र म्हणाले.

एकनाथ शिंदेंना हॉटेलात भेटणारा नेता कोण?

संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच जम्मू-काश्मीरला जाऊन आले. ते ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, तेथे त्यांना भेटायला कोण-कोण आले, याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. भविष्यात एक मोठा गौप्यस्फोट करेल, असा इशाराही संजय राऊतांनी दिला आहे.

Previous Post

मोठी बातमी! गावांमध्ये आता ‘एनए’ परवान्याची गरज नाही; गावठाणापासून २०० मीटर अंतरापर्यंतची अट

Next Post

मिरजेत ६ किलो गांजा जप्त; महात्मा गांधी पोलीस ठाण्याची कारवाई

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेत ६ किलो गांजा जप्त; महात्मा गांधी पोलीस ठाण्याची कारवाई

मिरजेत ६ किलो गांजा जप्त; महात्मा गांधी पोलीस ठाण्याची कारवाई

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group