• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

नव्या संसद भवनात दिसला सर्वधर्म समभाव; 12 धर्माच्या प्रतिनिधींनी केली प्रार्थना; पहा Video

Admin by Admin
May 28, 2023
in राजकीय
1 min read
0
नव्या संसद भवनात दिसला सर्वधर्म समभाव; 12 धर्माच्या प्रतिनिधींनी केली प्रार्थना; पहा Video
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

दिल्ली, 28 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नव्या संसद भवनाचे लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी त्यांच्या निवासस्थानाहून नव्या संसद भवनासमोर उभारण्यात आलेल्या मंडपात पोहोचले.

त्यांचे स्वागत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलं. नव्या संसद भवनाच्या लोकार्पणानंतर त्याच्या हॉलमध्ये सर्वधर्मीय प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सर्वधर्म प्रार्थना सभेत लोकशाहीच्या या मंदिरात सर्वधर्म समभाव दिसून आला. नव्या संसद भवनाच्या हॉलमध्ये सर्व धर्म प्रार्थना सभेत 12 धर्मांच्या प्रतिनीधींनी त्यांच्या धर्मातील पवित्र शब्द म्हटले आणि नव्या संसदेसाठी प्रार्थना केली.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशिवाय इतर मान्यवर उपस्थित होते. एएनआय वृत्तसंस्थेने याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हिडीओमध्ये दिसतं की सर्व धर्माचे प्रतिनिधी त्यांच्या त्यांच्या धर्मानुसार प्रार्थना करत आहेत. यावेळी समोर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हेसुद्धा आहेत.

#WATCH | 'Sarv-dharma' prayers are underway at the new Parliament building as the inauguration ceremony is led by PM Modi pic.twitter.com/6NyADeDZoM

— ANI (@ANI) May 28, 2023

प्रार्थना झाल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराजवळ होम हवन अनुष्ठानात पंतप्रधान सहभागी झाले. त्यानंतर लोकसभेच्या सभागृहात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या सेंगोलची विधीवत पुजा करण्यात आली. या सेंगोलसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साष्टांग दंडवतही घातला. संताच्या नेतृत्वात सेंगोल घेऊन पंतप्रधान मोदी संसद भवनात दाखल झाले. लोकसभा अध्यक्षांच्या उपस्थितीत लोकसभा सभापतींच्या खुर्चीसमोर सेंगोलची प्रतिष्ठापना करण्यात आली.

Previous Post

कुपवाडचे ग्रामदैवत हजरत लाडले माशायक दर्ग्याच्या बाहेरील बाजूस फरशी बसविण्याच्या कामाला सुरुवात

Next Post

नागज फाटा येथील जेवणासाठीचा अनाधिकृत एस.टी.बस थांबा बंद करा – परिसरात मागणी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
नागज फाटा येथील जेवणासाठीचा अनाधिकृत एस.टी.बस थांबा बंद करा – परिसरात मागणी

नागज फाटा येथील जेवणासाठीचा अनाधिकृत एस.टी.बस थांबा बंद करा - परिसरात मागणी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group