बोगस जीएसटी नोंदणी धारक
कुपवाड प्रतिनिधी :केंद्र व राज्य जीएसटी विभागांकडून सध्या १६ मे ते १५ जुलै अशी बोगस जीएसटी नोंदणी धारक शोध मोहिम सुरू असून या कारवाईने बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्यास आळा बसेल असे प्रतिपादन राज्य जीएसटी , सांगलीचे उप आयुक्त सचिन जोशी यांनी केले.ते कृष्णा व्हॅली चेंबर आणि केंद्र व राज्य जीएसटी विभाग, सांगली यांच्या वतीने जीएसटी पुनर्नोंदणी व विवरण पत्र अभय योजना , व्हॅट अभय योजना, बनावट नोंदणी विरोधी मोहिम “ या विषयावर चर्चासत्र प्रसंगी कुपवाड, सांगली येथे बोलत होते. यावेळी राज्य जीएसटी विभाग , सांगली विभागाचे उप आयुक्त सुनिल कानगुडे , केंद्रीय जीएसटी वरीष्ठ निरीक्षक राजेंद्र मेढेकर, संस्थेचे अध्यक्ष सतिश मालू, उपाध्यक्ष जयपाल चिंचवाडे यावेळी प्रमुख उपस्थित होते.
सचिन जोशी पुढे बोलताना म्हणाले की डाटा विश्लेषण व आर्टिफिशिल इनेलिजेन्स याद्वारे आलेल्या माहितीनुसार बोगस नोंदणी करून बनावट बिला माध्यमातून चुकीचे इनपुट टॅक्स क्रेडिट देणारे व घेणारे यांचेवर कर वसुली सह दंडांत्मक कारवाई व आवश्यक त्या प्रकरणात प्रसंगी फौजदारी कारवाई होऊ शकते.
माञ प्रामाणिक कर दाते यांनी कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नाही असे सांगितलं.
यावेळी बोलताना उप आयुक्त सुनिल कानगुडे यांनी अतिशय आकर्षक अशी व्हॅट अभय योजना शासनाने
सुरू केली असून व्यवसायिकांनी व्हॅटची जूनी थकबाकी समाप्ती साठी याचा ३१ ऑक्टोंबर पर्यंत लाभ घ्यावा असे सांगितले.
केंद्रीय जीएसटी चे वरीष्ठ निरीक्षक राजेंद्र मेढेकर यांनी यावेळी रद्द झालेली जीएसटी पुनर्नोंदणी, विशिष्ट कर निर्धारण नोटीसा तसेच काही विवरण पत्रे या साठी जीएसटी विभागाकडून अभय योजना सुरू असून ३० जून पर्यंत याचा फायदा घ्यावा असे सांगितले .तसेच यापूर्वी १० कोटी च्या वर उलाढाल असणाऱ्या कर दाते याना लागू असणारी यांनी ई इनव्हॉईस मर्यादा आता १ ऑगस्ट पासून ५ कोटी इतकी करण्यात येत आहे असे सांगितले .
यावेळी स्वागत करताना सतीश मालू यांनी उद्योगांसमोरील विविध मुद्द्यांवर भूमिका मांडून शासनाने याची तात्काळ दखल घ्यावी असे सांगितले.
संचालक रमेश आरवाडे यांनी आभार मानले. व्यवस्थापक अमोल पाटील यांनी संयोजन केले.
यावेळी ज्येष्ठ संचालक हरिभाऊ गुरव, राजगोंडा पाटील, एड.अनिल ताडे,एड. सतीश जाधव, संजय कोरे , कर सल्लागार माधव कुळकर्णी, शाह प्रेसिकाष्ट चे संजय जाधव, प्रकाश माने, फुलचंद शिंदे, ॲड. लखन वाडकर तसेच उद्योजक, विविध कंपन्यांचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

