• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मुंबई : सीबीएसईचा बारावीचा निकाल जाहीर; गेल्यावर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रमाणात साडेपाच टक्क्यांची घट

Admin by Admin
May 12, 2023
in शैक्षणिक
1 min read
0
मुंबई : सीबीएसईचा बारावीचा निकाल जाहीर; गेल्यावर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रमाणात साडेपाच टक्क्यांची घट
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून निकालात गेल्यावर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. यंदा निकालाची टक्केवारी 87.33 आहे.

यंदा 16 लाख 80 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील 19 हजार 607 विद्यार्थी परदेशातील होते. एकूण विद्यार्थ्यांपैकी 87.33 टक्के विद्यार्थी म्हणजेच 14 लाख 50 हजार 174 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्यावर्षीच्या तुलनेत निकाल 5.38 टक्क्यांनी घसरला आहे. गेल्यावर्षी (2022) 92.77 टक्के होते. राज्याचा समावेश असलेल्या पुणे विभागाचा निकाल 87.28 टक्के लागला आहे.

करोनापूर्वीच्या कालावधीपेक्षा निकालात वाढ

करोनाच्या साथीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत काही सवलती देण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी एखाद्या विषयाची परीक्षा न झाल्यास सरासरी काढून गुण देण्यात आले होते. त्यामुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढली होती. मात्र करोनाची साथ येण्यापूर्वीच्या परीक्षेचा निकाल म्हणजेच 2019 मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल यंदाच्या तुलनेत कमी लागला होता. 2019 मध्ये निकालाची टक्केवारी 83.40 होती. त्या तुलनेत यंदा निकाल जवळपास चार टक्क्यांनी वाढला आहे. त्याचबरोबर गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा परिक्षार्थींची संख्याही जवळपास 2 लाखांनी वाढली.

Previous Post

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील आरोप मागे, निलंबनही रद्द; शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Next Post

सांगली माधवनगर रस्त्यावर दुचाकी व टेम्पोचा अपघात दोघेजण ठार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली माधवनगर रस्त्यावर दुचाकी व टेम्पोचा अपघात दोघेजण ठार

सांगली माधवनगर रस्त्यावर दुचाकी व टेम्पोचा अपघात दोघेजण ठार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group