• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीतील धुळकरवाडीत वीज पडून दोन म्हैशी ठार; मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

Admin by Admin
May 11, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगलीतील धुळकरवाडीत वीज पडून दोन म्हैशी ठार; मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

दरीबडची : जत तालुक्यातील धुळकरवाडी परीसरात आज, गुरुवारी पहाटेच्या सुमारास वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह वळीव पावसाने हजेरी लावली होती. रात्रीच्या सुमारास जोरदार विजेच्या कडकडाट झाला.

दरम्यान, वीज पडून दोन म्हैशी ठार झाल्या. यादुर्घटनेत ईश्वर आप्पाराया करे यांचे अंदाजे ८० हजार रुपयाचे नुकसान झाले.

पूर्व भागातील धुळकरवाडी येथील ईश्वर करे हे कुंटुंबासह कर्नाटकातील हुबनूर गावाच्या सीमेलगतच्या शेतात राहतात. त्यांचा पशुपालनाचा व्यवसाय आहे. त्यांनी घरासमोर बाभूळीच्या झाडाला दोन म्हैशी बांधल्या होत्या. आज, सकाळच्या सुमारास अचानक विजाच्या कडकडाटासह वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी वीज पडून करे यांच्या दोन म्हैशी ठार झाल्या. सुदैवाने दुसऱ्या झाडाला बांधलेल्या दोन म्हैशी बचावल्या. मात्र या दुर्घटनेत करे यांचे मोठे नुकसान झाले.

धुळकरवाडी वीज पडून जनावरे दगावल्याची ही दुसरी घटना आहे. याआधी सुखदेव सोमा शिंदे यांच्या दोन जर्सी गाई २९ एप्रिलला वीज पडून ठार झाल्या होत्या. आठवडाभरानंतर ही दुसरी घटना घडली आहे.

या घटनेनंतर तलाठी, कोतवाल, पशुसंवर्धन विस्तार अधिकारी, पशुवैद्यकीय पर्यवेक्षक यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. पुढील कारवाईसाठी अहवाल संख येथील अप्पर तहसिलदार कार्यालयाकडे पाठविला आहे.

Previous Post

मोठी बातमी | जयंत पाटील यांना ईडीची नोटीस..

Next Post

कसली हिरवळ अन् कसला झिरवळ.. घरीच राहणार सुकलेला पडवळ!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कसली हिरवळ अन् कसला झिरवळ.. घरीच राहणार सुकलेला पडवळ!

कसली हिरवळ अन् कसला झिरवळ.. घरीच राहणार सुकलेला पडवळ!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group