कुपवाड : खबऱ्या प्रतिनिधी / बौद्ध जयंतीचे औचित्य साधून कुपवाड सिद्धार्थनगर येथील तक्षशिला बुद्ध विहार या समाज मंदिराच्या नवीन वास्तू व ग्रंथालय कामाचे भूमिपूजन पालकमंत्री मा.सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते व मा.मोहन वनखंडे सर,पोलीस निरीक्षक अविनाश पाटील,नगरसेवक प्रकाश ढंग,कुपवाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सनी धोतरे,आनंदा कांबळे,मिलिंद सरोदे,प्रकाश पाटील,अमोल कांबळे,मोहन जाधव ,प्रकाश वानखडे ,समीर मुजावर गणेश धोतरे,मयुर सरोदे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले.

सदर कामासाठी नगरसेवक मा.प्रकाश ढंग यांनी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्याकडून 20 लाख रुपये व कुपवाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष मा.सनी धोतरे यांनी शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मा.पृथ्वीराज बाबा पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात्यामधून 20 लाख रुपयांचा निधी प्राप्त करून घेतला.
चांगली वास्तू चांगल्यासाठी बांधतोय आपण त्यामध्ये कुठेही चूक पणा करून कुणीही इथं काहीतर करायचं म्हणून तिथे येऊ नये मी प्रकाशला आणि तुम्हां सगळ्यांना सांगतो हे काम होणार मी नारळ फोडला आहे.:- मंत्री सुरेश भाऊ खाडे
यावेळी बोलताना मंत्री सुरेशभाऊ खाडे म्हणाले, आपल्या हातून चांगलं काम होत आहे,काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या समाजमंदिराचे होत आहे.मी आपणा सर्वांना सांगतो किती जरी अडथळे आले,किती जरी अडचणी आल्या तरीही अडथळे पार करून हे काम आम्ही पूर्ण करू,हे काम पूर्ण होणारच,नारळ मी फोडलाय असे बोलून तक्षशिला बुद्ध विहार व ग्रंथालय कामासाठी मी या कामासाठी २० लाख दिले आहेत. मा.पृथ्वीराज बाबा पाटील यांनीही २० लाख दिलेत त्यांचेही आभार मानले.अजून निधी लागला,तरी देण्याची ग्वाही दिली.
यावेळी संजय धोतरे, श्रीकांत धोतरे, दिलीप धोतरे, अरुण धोतरे, पंकज धोतरे,अजित सरोदे,संपत धोतरे, रविभाऊ सरोदे, दयानंद कांबळे, मोहन साबळे,नाना धोतरे,जयसिंग धोतरे, व सिद्धार्थ नगर मधील महिला व युवक वर्ग ही उपस्थित होता.

