• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

अवैध वाळू तस्करी प्रकरणी पकडलेले वाहन कार्यालयातून पळवले

वाहन मालकावर गुन्हा दाखल

Admin by Admin
May 7, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
अवैध वाळू तस्करी प्रकरणी पकडलेले वाहन कार्यालयातून पळवले
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कडेगाव:-अवैध वाळू वाहतूक प्रकरणी वांगी मंडळ अधिकाऱ्यांच्या पथकाने कारवाई करून तहसील कार्यालयात आणून लावलेला ट्रॅक्टर पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर तहसील प्रशासनाचे वतीने वाहन मालकावर कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वांगी मंडळ अधिकारी यांचे पथकाने शुक्रवारी रात्री ११:३० च्या दरम्यान वडिये रायबाग येथे विना नंबर चा निळ्या रंगाचा सोनालिका ट्रॅक्टर व निळ्या रंगाची ट्रॉली त्यात सुमारे एक ब्रास वाळू अवैध रितीने वाहतूक करीत असताना पकडून तहसील कार्यालयात आणून लावला होता. ट्रॅक्टर कार्यालयात आणून लावल्या नंतर पथक पुन्हा गस्तीसाठी गेले होते. गस्त घालून आल्यानंतर सुमारे साडेचार च्या दरम्यान पथक तहसील कार्यालयात आले असता वरील ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या आवारात लावले ठिकाणी गौनखनिज पलटी करून पळवून नेल्याचे पथकाचे लक्षात आले. सदर वाहन पळवून नेत असताना आडवे लावलेल्या शासकीय वाहनास इजा पोहचवल्याचे ही पथकाचे लक्षात आले.

त्यानंतर शनिवारी सकाळी पथक प्रमुख तथा मंडळ अधिकारी प्रकाश सूर्यवंशी यांनी सदर घटनेची फिर्याद कडेगाव पोलीस ठाण्यात नोंदवली व वाहन मालक आकाश तानाजी शेळके यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध गौण खनिज वाहतूकीवर कडक कारवाई

अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर कठोर कारवाई करणार असल्याचं तहसीलदार अजित शेलार यांनी सांगितले आहे. तसेच शुक्रवारी रात्री पथकाने पकडलेला ट्रॅक्टर वीना नंबर असल्याने याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना लेखी कळवून त्यांच्या मार्फत ही कठोर कारवाई साठी लेखी पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगितले.

Previous Post

मिरजेत चोरी करणाऱ्या तिघांना अटक ; दीड लाखांचा माल जप्त ; एलसीबीची कारवाई

Next Post

चंगू मंगू राणे कंपनीला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही ; शिवसेना नेते शरद कोळी यांनी साधला राणे कुटुंबियांवर निशाणा.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
चंगू मंगू राणे कंपनीला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही ; शिवसेना नेते शरद कोळी यांनी साधला राणे कुटुंबियांवर निशाणा.

चंगू मंगू राणे कंपनीला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही ; शिवसेना नेते शरद कोळी यांनी साधला राणे कुटुंबियांवर निशाणा.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group