• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

आगे आगे तो देखो होता है क्या..? नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा.

Admin by Admin
March 23, 2022
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
आगे आगे तो देखो होता है क्या..? नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar ) यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने जोरदार दणका दिलाय.

पाटणकर यांच्या ठाण्यातील 11 सदनिका ईडीने जप्त केल्या आहेत. त्याची आजची किंमत 6 कोटी 45 लाख असल्याची माहिती ईडीने दिलीय. ईडीने पुष्पक ग्रुपच्या (Pushpak Group) कंपन्यांपैकी एक असलेल्या मेसर्स पुष्पक बुलियनशी संबंधित 6 कोटी 45 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आलीय. यात साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील 11 सदनिकांचा समावेश आहे, असं ईडीकडून सांगण्यात आलंय. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी ईडीच्या या कारवाईनंतर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘आगे आगे देखो होता है क्या’ असं म्हणत थेट इशारा दिलाय.

‘आगे आगे देखिए होता है क्‍या! महाराष्‍ट्रात भ्रष्‍टाचाराने कळस गाठलाय. जनतेचे शोषण होत आहे. सूडबुद्धीने कारवाया होत आहेत. यालाच म्‍हणतात चोराच्‍या उलट्या बोंबा. सव्वा दोन वर्षांत महाराष्‍ट्राच्‍या शेतकऱ्यांना, एसटी कर्मचाऱ्यांना काय मिळाले? त्‍यांच्‍या नशिबी आत्‍महत्‍या! आप्‍तांच्‍या तिजोऱ्यांमध्ये मात्र कोट्यवधींची भर. ही संपत्‍ती कुठून आली? कोणाकडून आणली? शिवसैनिकांच्‍या वाट्याला यातील काहीही नाही. सत्‍ता फक्‍त आपण आणि आपल्‍या नातेवाईकांसाठीच!’ असं ट्वीट करत राणे यांनी मुख्यमंत्र्यांना इशारा देत जोरदार टीकाही केलीय.

नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

आप्‍तांच्‍या तिजोऱ्यांमध्ये मात्र कोट्यवधींची भर. ही संपत्‍ती कुठून आली? कोणाकडून आणली? शिवसैनिकांच्‍या वाट्याला यातील काहीही नाही. सत्‍ता फक्‍त आपण आणि आपल्‍या नातेवाईकांसाठीच!

— Narayan Rane (@MeNarayanRane) March 22, 2022

नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

‘थेट मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांवर ही कारवाई झाली आहे. आता मुख्यमंत्री कशासाठी थांबलेत, त्यांनी राजीनामा द्यावा. आतापर्यंत आम्ही सगळीकडे त्यांचं नाव ऐकत होतो. ते आता सिद्ध झालं आहे. तो पैसा काही त्यांच्या घरापर्यंत मर्यादित राहिलेला नाही. ते भुयारी गटार थेट मातोश्रीपर्यंत जातं. त्यामुळे आता मातोश्रीने उत्तर द्यायला हवं, मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला उत्तर द्यावं. सचिन वाझे आणि हे पैसे कुठे कुठे फिरत आहेत हे आता समोर आलंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नैतिक दृष्टीकोनातून राजीनामा द्यावा’, अशी आक्रमक मागणी आमदार नितेश राणे यांनी केलीय.

Previous Post

भिकवडी ग्रामसेवकाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर

Next Post

गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू

गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group