• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सावकारकीचा बडा मासा लागला गळाला …! मार्च एन्ड मुळे कर्तव्यदक्षता आली तोडपाण्याच्या फळाला…? अन राजकीय हस्तक्षेप …

Admin by Admin
April 1, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सावकारकीचा बडा मासा लागला गळाला …! मार्च एन्ड मुळे कर्तव्यदक्षता आली तोडपाण्याच्या फळाला…? अन राजकीय हस्तक्षेप …
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे: खबऱ्या प्रतिनिधी/गेल्या एक महिन्यांपासुन शिरुर तालुक्यातील विविध गावात सर्वसामान्य लोकांची पिळवणूक करणाऱ्या सावकारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. शिरुर शहरातील उच्चभ्रू वसाहतीमध्ये राहणारा आणि गेले अनेक वर्षापासून बेकायदा सावकारकी करणाऱ्या सतीश उत्तमचंद संघवी याच्यावर शिरुर पोलिस ठाण्यात बेकायदेशीर सावकारकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

मार्च महिन्यात बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या चौथ्या व्यक्तीवर शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ फेब्रुवारी रोजी शिरुर येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात सुरेश काशिनाथ भुजबळ (वय ५३ वर्षे, रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांच्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने (ता. ३१) मार्च रोजी गैरअर्जदारच्या घरझडतीत मिळालेल्या कागदपत्रावरून तक्रारदाराच्या मुद्यामध्ये सत्यता दिसून आली असून, तक्रारदारास अवैधरित्या व्याजाने पैसे देऊन जमीन नावावर करुन अपहार केल्याचे स्पष्ट होत आहे. यावरून सतीश उत्तमचंद संघवी (रा.आनंद कॉलनी, शिरुर, ता. शिरूर जि. पुणे) हे अवैध सावकारी व्यवसाय करुन लोकांची पिळवणूक करीत असल्याचे स्पष्ट होत आहे.

सतीश उत्तमचंद संघवी यांनी सावकारी परवाना घेतलेला नाही म्हणून सावकारी नियमन अधिनियम २०१४ मधील कलम ३९ अन्वये सरकार तर्फे गजाजन पुंड, सहानिबंधक सहकारी संस्था श्रेणी २ यांनी रितसर फिर्याद दिली आहे. सदर कारवाईच्या घरझडतीमध्ये अनेक बेकायदा सावकारकी संदर्भातील आक्षेपार्ह कागदपत्रे आढळून आली असून, तालुक्यातील अनेक गोरगरिब लोकांच्या जमीनी हडपल्या असल्याबाबत संशय व्यक्त होत आहे. शिरुर पोलिस स्टेशन व सहाय्यक निबंधक यांनी बेकायदेशीर सावकारकी तालुक्यातून हद्दपार करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

या सावकाराविरुद्ध अथवा इतर सावकारांविरुद्ध तक्रारी असल्यास घाबरुन न जाता तक्रार दाखल करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले आहे. सदरची कारवाई पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पोलिस उपनिरीक्षक अभिजित पवार, पोलिस हवालदार गणेश देशमाने, पोलिस अंमलदार संतोष सांळुंके, राजेंद्र गोपाळे, प्रतिमा नवले सहायक निबंधक कुंभार, गजानन पुंड यांच्या पथकाने केली आहे.

कारवाई न होण्यासाठी राजकीय दबाव…

सदरची कारवाई होत असताना राजकीय हस्तक्षेप मोठया प्रमाणावर होत होता. अनेक पळवाटा शोधण्याचा प्रयत्नही झाला. परंतु तक्रारदार ठाम राहिल्याने अखेर गुन्हा दाखल होऊन तक्रारदाराला न्याय मिळाला. याआधीच शिरुर पोलिस स्टेशनमध्ये तालुक्यातील ३ सावकारांवर गुन्हे दाखल झाले आहेत. शिरूर तालुक्यातील बडया सावकारांविरुद्ध जोरदार कारवाई करणे गरजेचे आहे. शिरुर तालुक्यात अनेक गुन्हे दाखल होत असताना अनेकदा राजकीय हस्तक्षेप मोठया प्रमाणावर होत असून गुन्हा दाखल करताना पळवाटा शोधण्याचे काम राजकीय नेत्यांकडून होत आहे. त्यामुळे गरीब जनता न्याय मिळवण्यापासून वंचित राहत आहे. याची दखल वरीष्ठ अधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे.

मार्च एन्ड म्हणजे सावकारांची दिवाळीच…

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शेती व इतर व्यवसाय अडचणीत आले आहेत. त्यातच मार्च महिन्यात अनेक लोकांना बँकेचे व्यवहार पुर्ण करायचे असतात. शेतकऱ्यांना दरवर्षी मार्च महिन्यातच विविध कार्यकारी सोसायटीची कर्ज भरुन नवी-जुनी करायची असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने सवकारांच्या दारात जावं लागत याच गोष्टींचा फायदा घेत सावकार अव्वाच्या सव्वा व्याज घेत लोकांची पिळवणूक करत असल्याचे उघडकीस येत आहे. अनेकवेळा लोकांच्या जमिनी गहाण ठेऊन त्यांना कर्ज देताना चक्रवाढ पध्दतीने व्याज वसुल केली जात आहे. शिरुर तालुक्यात बेकायदेशीर सावकारा विरुद्ध पहिला गुन्हा, निमोणे येथील संतोष सुरेश काळे, सुरेश जगन्नाथ काळे, दुसरा गुन्हा शिरुर येथील सुभाष बळवंत घावटे, तिसरा गुन्हा गणेगाव दुमाला येथील अजित अर्जुन कोंडे, मयुर जिजाबा कदम तर चौथा गुन्हा सतीश उत्तमचंद संघवी या चार सावकारांवर आजपर्यंत गुन्हे दाखल झाले आहेत.

तक्रारदारांनी पुढे यावे….

शिरुर तालुक्यात जर सावकारांकडुन कोणाला त्रास होत असेल अथवा कोणाची आर्थिक पिळवणुक होत असेल तर तक्रारदारांनी घाबरुन न जाता थेट माझ्याशी ९८२३१०८४५२ या क्रमांकावर थेट संपर्क साधावा असे आवाहन शिरुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी केले आहे

Previous Post

भाजपसारखं पुढं बोलायची सवय नाही, जयंतरावांचा टोला…

Next Post

ब्रेकिंग : किरीट सोमया यांचे पुढचे टार्गेट  ‘हे’ मंत्री !

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग : किरीट सोमया यांचे पुढचे टार्गेट  ‘हे’ मंत्री !

ब्रेकिंग : किरीट सोमया यांचे पुढचे टार्गेट  ‘हे’ मंत्री !

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group