• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत तणावाचे वातावरण ; महापालिकेच्या आयुक्तांना बूट फेकून मारला ; कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन..!

फाईल मंजूर न केल्याने कृत्य, एकजण ताब्यात..

Admin by Admin
April 3, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, विशेष, सामाजिक
1 min read
0
दप्तर दिरंगाई प्रकरणी “या” अधिकाऱ्याला सांगली जिल्हा परिषदेने केले निलंबित..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकाने गेल्या ११ वषार्पासून त्याची फाईल मंजूर न केल्याने आयुक्तांच्या दिशेने बूट फेकला. यानंतर एकच खळबळ उडाली. दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान या
घटनेनंतर महापालिकेचे सर्व कमर्चारी मुख्यालयात जमले होते.

त्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे महापालिका कायार्लयात तणावाचे वातावरण आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तात्काळ एकाला ताब्यात घेतले आहे.

सांगलीतील कैलास काळे असे ताब्यात घेतलेल्याचे
नाव आहे. आज सोमवारी महापालिकेतर्फे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेच्या
सांगलीतील मुख्यालयात हा लोकशाही दिन आयोजित करण्यात आला होता. यावेळी कैलास काळेही उपस्थित होते. त्यांनी गुंठेवारी नियमतीकरणासाठी २०१२ मध्ये फाईल महापालिकेत दिली होती. ती मंजूर न झाल्याने ते संतप्त झाले. यावेळी आयुक्तांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांशी काळे यांचा वाद झाला. त्यानंतर काळे यांनी आयुक्तांच्या दिशेने बूट फेकला. ही घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली.

या घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभिजित देशमुख तातडीने फौजफाट्यासह महापालिकेत पोहोचले. त्यांनी काळे याला ताब्यात घेतले. दरम्यान आयुक्तांच्या दिशेने बूट फेकल्याची माहिती मिळताच महापालिकेचे अधिकारी, कमर्चारी मुख्यालयात दाखल झाले. त्यांनी या घटनेचा निषेध करत कामबंद आंदोलनाची घोषणा केली. यावेळी महापालिका परिसरात  तणाव निर्माण झाला होता. दरम्यान पोलिसांनी काळे याला ताब्यात
घेतले असून त्याच्याकडे चौकशी सुरू आहे. शिवाय महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांना भेटून पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख अधिक माहिती घेत आहेत.

Previous Post

पोलिसांच्या कागदोपत्री रेकॉर्डवर अर्धा किलो सोने , ताब्यात घेतले दोन किलो अन् दीड किलो सोन्यावर मारला डल्ला.?

Next Post

ब्रेकिंग! चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना फोन; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग! चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना फोन; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

ब्रेकिंग! चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना फोन; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group