• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पोलिसांच्या कागदोपत्री रेकॉर्डवर अर्धा किलो सोने , ताब्यात घेतले दोन किलो अन् दीड किलो सोन्यावर मारला डल्ला.?

Admin by Admin
April 2, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, शोध पत्रकारिता
1 min read
0
पोलिसांच्या कागदोपत्री रेकॉर्डवर अर्धा किलो सोने , ताब्यात घेतले दोन किलो अन् दीड किलो सोन्यावर मारला डल्ला.?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली :खबऱ्या प्रतिनिधी / कोलकाता येथे सोन्याच्या दुकानात काम करणार्‍या तरुणाला दोन किलो सोने सापडले. हे तिथल्या व्यापार्‍याला समजले. सोन्याचा हिस्सा मागण्यासाठी तो व्यापारी त्या तरुणाच्या मागे लागला.

तरुणाने सोने घेऊन आटपाडी तालुक्यातील बनपुरी गाव गाठले. त्या ठिकाणी त्याच्या मित्राकडे दोन किलो सोने दिले. याचा सुगावा व्यापार्‍याला लागल्यानंतर त्याने पोलिसांच्या मदतीने छापा टाकून सोने हस्तगत केले. पण, पोलिसांनी दोन किलो सोने हस्तगत करून त्यातील दीड किलो सोन्यावर डल्ला मारला. या सर्व प्रकाराची तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केल्यानंतर मात्र पोलिसांचे धाबे दणाणले आहेत.

याबाबत सागर जगदाळे (रा. करगणी, ता. आटपाडी) यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दिली आहे. याबाबत माहिती अशी की, सागर मंडले (रा. बनपुरी, ता. आटपाडी) हा कोलकत्ता येथे सोन्याच्या दुकानात कामाला आहे. त्याला कोलकात्यात दोन किलो सोन्याची लगड सापडली. याची माहिती कोलकाता येथील सोन्याचा व्यापारी सूरज मकबूल मुल्ला याला समजली. मुल्ला याने मंडलेकडे सापडलेले सोने मागितले. परंतु मंडले याने सोने देण्यास नकार देऊन बनपुरी गाव गाठले व ते सर्व सोने त्याने त्याचा मित्र सागर जगदाळे याच्याकडे दिले. ही माहिती मुल्ला याला समजल्यानंतर त्याने स्थानिक पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी जगदाळे व मंडले यांच्या घरी छापा टाकला व दोन किलो सोने हस्तगत केले. परंतु, केवळ 455 ग्रॅम सोने रेकॉर्डवर दाखवून 1545 ग्रॅम सोने पोलिसांनी हडप केल्याचे जगदाळे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Previous Post

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना ;

Next Post

सांगलीत तणावाचे वातावरण ; महापालिकेच्या आयुक्तांना बूट फेकून मारला ; कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
दप्तर दिरंगाई प्रकरणी “या” अधिकाऱ्याला सांगली जिल्हा परिषदेने केले निलंबित..!

सांगलीत तणावाचे वातावरण ; महापालिकेच्या आयुक्तांना बूट फेकून मारला ; कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group