• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली बाजार समितीच्या निवडणुकीसाठी जोरदार चुरस ; आत्तापर्यंत 185 अर्ज दाखल…

Admin by Admin
April 1, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
सांगली बाजार समितीच्या निवडणुकीसाठी जोरदार चुरस ; आत्तापर्यंत 185 अर्ज दाखल…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या असल्या तरी अद्याप पॅनलबाबत संभ्रम कायम आहे. नेत्यांमध्ये अद्यापही चर्चेच्या फेऱया सुरूच आहेत.

नेते वेट ऍण्ड वॉचच्या भूमिकेत असून, इच्छुकांना अर्ज भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर पॅनलवर शिक्कामोर्तब होणार असल्याचे चित्र दिसते. दरम्यान, निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी तब्बल 165 उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

सांगली बाजार समितीचे मिरज, कवठेमहांकाळ आणि जत या तीन तालुक्यांत कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे सांगली बाजार समिती राजकीयदृष्टय़ा संवेदनशील मानली जाते. या बाजार समितीमध्ये सत्ता आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील, डॉ. विश्वजित कदम, विक्रमसिंह सावंत, खासदार संजय पाटील यांचे पॅनल तर भाजपचे विलासराव जगताप, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, अजितराव घोरपडे या नेत्यांमध्ये दुसरे पॅनल होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याची चर्चा होत आहे; मात्र काही नेत्यांनी पक्षीय पातळीवर निवडणूक लढविण्यास विरोध केला आहे. या परिस्थितीत मंत्री सुरेश खाडे यांनी भाजप स्वतंत्र लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ही निवडणूक पक्षीय चिन्हावर होणार की नाही, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.

चौथ्या दिवशी 165 अर्ज दाखल

सांगली कृषी बाजार समितीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी तब्बल 165 जणांनी अर्ज दाखल केले. सोसायटी गटातून, सोसायटी गट महिला राखीव 9, सोसायटी गट नागरिकांचा मागास प्रवर्ग 7, सोसायटी गट भ.वि.जा.अ. 14, ग्रामपंचायत गट 35, ग्रामपंचायत अनु. जाती 2, ग्रामपंचायत आर्थिकदृष्टय़ा दुर्बल 7, व्यापारी गट 12 व हमाल तोलाईदार गटातून 9 अर्ज दाखल झाले. आत्तापर्यंत 185 अर्ज भरण्यात आले आहेत.

शेवगाव बाजार समितीसाठी 76 अर्ज

शेवगाव – तालुका बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी सोसायटी मतदारसंघाच्या सर्वसाधारण जागेसाठी 23, महिला विभागातून 3, इतर मागास प्रवर्ग 5, विमुक्त जाती-जमाती, ग्रामपंचायत मतदारसंघाच्या सर्वसाधारण 3, अनुसूचित जाती -जमाती 4, दुर्बल घटक 2, व्यापारी-अडते मतदारसंघ 5, हमाल मापाडी मतदारसंघातून 2 असे एकूण 50 अर्ज दाखल झाले आहेत. आजअखेर एकूण 76 अर्ज दाखल झाले आहेत.

राहुरी बाजार समितीसाठी 70 अर्ज दाखल

राहुरी – राहुरी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी 70 उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एस. पी. रुद्राक्ष यांनी दिली. 18 जागांसाठी आजअखेर 132 जणांनी उमेदवारी अर्ज नेले असून, त्यात 70 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये (कृषी पतसंस्था मतदारसंघात) सर्वसाधारण जागेसाठी 43, महिला राखीव 6, इतर मागासवर्ग 2 व विमुक्त जाती व भटक्या जमाती 10 अर्ज, (ग्रामपंचायत मतदारसंघ) सर्वसाधारण 4, अनुसूचित जाती/जमाती 2, (व्यापारी आडते मतदारसंघ) 3, (हमाल मापाडी मतदारसंघ) असे एकूण 70 अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 3 एप्रिल अंतिम शेवटचा दिवस आहे.

Previous Post

विजय ताड हत्या प्रकरणात ‘ शूटर्स’ गळाला, ‘ सुपारी’ बहाद्दर मोकाटच..!

Next Post

शिवसेना नेते खा. संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी; पुण्यातून एकास उचलले!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
शिवसेना नेते खा. संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी; पुण्यातून एकास उचलले!

शिवसेना नेते खा. संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी; पुण्यातून एकास उचलले!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group