• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे थायरॉईड ओपीडीचे उद्घाटन

Admin by Admin
April 1, 2023
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
अल्पवयीन गर्भवती माता व बाळाचा मृत्यू, प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवतीमुळे बालविवाहाचे प्रकरण उघडकीस..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 30 मार्च 2023 पासून “थायरॉईड ओपीडी” सुरू करण्यात आली आहे. मिशन थायरॉईड या उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे सुद्धा थायरॉईड ओपीडी सुरू करण्यात असून थायरॉईड ओपीडी उद्घाटन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बाह्य रुग्ण विभागामध्ये करण्यात आले.

थायरॉईड ओपीडी उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. रजनी जोशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. अनिता बसवराज, नोडल अधिकारी डॉ. अभय भोसले, डॉ. मगदूम, डॉ. पाटणकर, डॉ. माळी, डॉ. बारावकर, अधिसेविका श्रीमती शहाणे व श्रीमती दीप आदी उपस्थित होते.

यावेळी मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. अनिता बसवराज यांनी थायरॉईड आजारांविषयी मार्गदर्शन केले. तसेच थायरॉईड मिशनचे नोडल ऑफिसर डॉ. अभय भोसले यांनी थायरॉईड ओपीडी बद्दल उपस्थितांना अवगत केले. थायरॉईड ओपीडीचा समाजातील सर्व घटकांनी उपभोग घेऊन थायरॉईड आजारांपासून स्वतःची मुक्तता करण्याचे आव्हान प्रशासनामार्फत करण्यात आले.

सध्या थायरॉईड रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत असून अनेक रुग्णांना काही समस्यांना सामोरे जावे लागत आहे असे निदर्शनास येते. याकरिता मिशन थायरॉईड अंतर्गत स्वतंत्र थायरॉईड ओपीडीमध्ये एकाच छताखाली त्यांना आवश्यक असलेल्या सर्व तज्ज्ञांची सेवा, तपासण्या व उपचार उपलब्ध करण्याच्या हेतूने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मेडिसिन, सर्जरी, कान नाक घसा विभाग हे एकाच छताखाली कार्यरत असतील. या रुग्णांकरिता आठवड्याच्या दर गुरुवारी दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये ओपीडी नंबर 8 मध्ये रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. थायरॉईड ओपीडी ही संकल्पना संपूर्ण राज्यभर राबविण्यात येणार असून या संकल्पनेमुळे राज्यभर रुग्णांमध्ये थायरॉईडच्या आजारासंबंधी जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार आहे.

Previous Post

जागेच्या वादातून डोक्याला पिस्तूल लावून मारहाण ; ९ जणांवर गुन्हा दाखल.

Next Post

मिरजेत चाकू हल्ला ; एक जखमी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली जिल्ह्यात राष्ट्रध्वज अवमान प्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल.

मिरजेत चाकू हल्ला ; एक जखमी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group