• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

बुलढाण्यात पोलिसांचे ‘फायर है मैं..!’

-चांदमारी परिसरात गुंजला ठो.. ठो..चा आवाज

Admin by Admin
March 25, 2023
in क्राईम
1 min read
0
बुलढाण्यात पोलिसांचे ‘फायर है मैं..!’
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

-जिल्हा पोलीस दलाचा वार्षिक गोळीबारीचा सराव

बुलढाणा : खबऱ्या प्रतिनिधी/ गुंडगिरीला रोखण्यासाठी कधीकधी पोलिसांना हाती शस्त्र घ्यावे लागते. रक्षणार्थ पोलिसांना शस्त्र देखील देण्यात आले आहेत. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना या शस्त्राची हाताळणी आणि गोळीबाराची उजळणी व्हावी म्हणून दरवर्षी वार्षिक गोळीबार सराव घेण्यात येत असतो.याही वर्षीही जिल्हा पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी १६ ते २१ मार्चदरम्यान वार्षिक गोळीबारीचा सराव चांद मारी परिसरात करण्यात आला. पोलिसांसह एलसीबी प्रमुख अशोक लांडे यांनी सरावात अचूक निशाणा साधला.

जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक गोळीबारी सरावांमध्ये ११२ अधिकाऱ्यांसह १ हजार ८८ कर्मचाऱ्यांनी सराव केला. यामुळे येथील चांदमारी परिसरातील गोळीबार मैदानावर पाच दिवस नुसता गोळीबारीचा आवाज घुमत होता. जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली येथील चांदमारी परिसरातील गोळीबार मैदानावर जिल्हा पोलिस दलाचा गोळीबार सराव १६ ते २१ मार्चदरम्यान सुरू होता. पोलिस दलातील कर्मचारी सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत सराव करीत असल्याने मैदानावर नुसता फायरिंगचा आवाज घुमत होता. यामध्ये दररोज १५० ते २०० पोलिस कर्मचारी अधिकारी यांच्यासह एलसीबीचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे, अपर पोलिस अधीक्षक बी.बी. महामुनी व १ हजार ८८ कर्मचारी आणि ११२ अधिकाऱ्यांनी सराव केला.

अत्याधुनिक शस्त्राने सराव

दरवर्षी हा सराव केला जातो. या सरावामध्ये पाच दिवसांत ११२ अधिकारी, १ हजार कर्मचाऱ्यांनी सराव केला. या शस्त्राद्वारे केला सराव पोलिसांना पिस्टल, रिव्हॉल्व्हर, कारबाइन, टेलबोर, एसएलआर, इन्सास आणि एके ४७ या अत्याधुनिक शस्त्राद्वारे गोळीबारचा सराव केला गेला. यातील प्रत्येक शस्त्राच्या प्रत्येकी १० राऊंड देण्यात आल्या होत्या.

एसपी आवाड म्हणाले..

दैनंदिन कामकाजात शस्त्र हाताळणीचा विसर पडू नये, म्हणून दरवर्षी गोळीबार सराव केला जातो. यंदाही अधिकारी कर्मचाऱ्यांनी हा सराव केला. यातून परिस्थिती हाताळण्याचे सामर्थ्य येते. कर्मचाऱ्यांसाठी लवकरच उजळणी पाठ्यक्रम राबविला जाणार आहे.

Previous Post

जेव्हा तहसीलदार स्वतः दिलेल्या निर्णयाची फेरसुनावणी घेऊन निर्णय बदलतात

Next Post

भाजपचा किंग मेकर हरपला; पुण्यात खासदार गिरीश बापट यांचं निधन..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
भाजपचा किंग मेकर हरपला; पुण्यात खासदार गिरीश बापट यांचं निधन..

भाजपचा किंग मेकर हरपला; पुण्यात खासदार गिरीश बापट यांचं निधन..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group