• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

जेव्हा तहसीलदार स्वतः दिलेल्या निर्णयाची फेरसुनावणी घेऊन निर्णय बदलतात

भ्रष्टाचाराचे नवीन प्रकरण

Admin by Admin
March 25, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, माफ करा स्पष्ट बोलतो, राजकीय, शोध पत्रकारिता, सामाजिक
1 min read
0
जेव्हा तहसीलदार स्वतः दिलेल्या निर्णयाची फेरसुनावणी घेऊन निर्णय बदलतात
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली जिल्ह्यात नक्की चाललंय काय?

सांगली:- सांगली जिल्ह्यातील एका तहसीलदार महोदयांनी स्वतः दिलेल्या निर्णयाबाबत फेर सुनावणी घेऊन निर्णय बदलल्याची धक्कादायक बाब समोर आली असून भ्रष्टाचाराचे हे नवीन प्रकरण सध्या चर्चेचा विषय बनला आहे. सांगली जिल्ह्यात हे नक्की काय चाललंय असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत खबऱ्या संपूर्ण प्रकरणावर बारीक लक्ष ठेऊन असून प्रकरण हाती लागताच याचा पोलखोल केला जाणार आहे.

याबाबत खबऱ्याला मिळालेली माहिती अशी की, अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठी यांनी एक वाहन पकडलं आणि तहसील कार्यालयात आणून लावलं होतं. या प्रकरणात दंडाची नोटीस मिळाल्यानंतर माझे वाहनात इतके गौनखनिज अवैध नसल्याचा खुलासा वाहन मालकाकडून सादर करण्यात आला, सोबत शासकीय पावती सादर करण्यात आली. सदर खुलासा संबंधित तहसीलदार यांनी अमान्य केला .मात्र वाहन मालकाने त्यावर नाराज होऊन प्रांताधिकारी यांचेकडे अपील दाखल केले. यात प्रांताधिकारी यांनी गौनखनिज पावत्या पाहून अपील अंशतः मान्य करून फेर चौकशी साठी तहसीलदार यांचेकडे पाठवले.

यात तहसीलदार महोदयांनी स्वतः च्या कोर्टात स्वतःलाच जाबदार बनवले आणि पूर्वी दिलेला स्वतःचा आदेश रद्द करीत कमी दंडाचा नवीन आदेश पारित केला. जाणकारांच्या म्हणण्यानुसार स्वतः दिलेला आदेश स्वतः रद्द करणे किंवा स्वतःच्या कोर्टात स्वतःला जाबदार बनवणे आणि सुनावणी घेणे बेकायदेशीर आहे. या प्रकरणात एका राजकीय नेत्याच्या शिफारशी वरून फेरबदल करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. आज राजकीय नेते ढवळाढवळ करीत नाहीत असे कोणतेही क्षेत्र नाही पण किमान अधिकाऱ्यांनी कागदपत्रे रंगवताना स्वतः अडचणीत येऊ अशी रंगवू नयेत. एकूणच याबाबत खबऱ्या संपूर्ण प्रकरणावर बारीक लक्ष ठेऊन असून प्रकरणाबाबत खात्रीशीर माहिती मिळताच पोलखोल केली जाणार आहे.

Previous Post

मिरज तालुक्यात खळबळ ; शेतरस्त्याच्या वादातून काकाचा पुतण्याकडून खून.

Next Post

बुलढाण्यात पोलिसांचे ‘फायर है मैं..!’

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बुलढाण्यात पोलिसांचे ‘फायर है मैं..!’

बुलढाण्यात पोलिसांचे ‘फायर है मैं..!’

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group