Saturday, June 7, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज तालुक्यात खळबळ ; शेतरस्त्याच्या वादातून काकाचा पुतण्याकडून खून.

Admin by Admin
March 24, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
0
मिरज तालुक्यात खळबळ ; शेतरस्त्याच्या वादातून काकाचा पुतण्याकडून खून.

मिरज :खबऱ्या प्रतिनिधी/ बेळंकी ता.मिरज येथे शेतातील वहिवाटीचा रस्ता बंद केल्याच्या कारणातून डॉ. सुनिल आप्पासाहेब गायकवाड (वय ५०, रा.गायकवाड मळा, बेळंकी) यांच्यावर धारदार हत्यारांने वार करुन पुतण्याने खून केला. बेळंकी – जानराववाडी रस्त्यावर गायकवाड वस्ती, कॅनॉलजवळ काल, गुरुवारी (दि.२३) रात्री ही घटना घडली.

याप्रकरणी मृत सुनिल यांचा मुलगा सत्यजित सुनिल गायकवाड यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी जितेंद्र सर्जेराव गायकवाड (२७) यास ताब्यात घेतले.

बेळंकीत गायकवाड मळा परिसरात पशुवैद्यकतज्ञ सुनिल गायकवाड व जितेंद्र गायकवाड या काका पुतण्यांची शेतजमीन आहे. जमीनीत ये-जा करण्यासाठी वहिवाटीच्या रस्त्याच्या वादामुळे डॉ. गायकवाड यांनी हा रस्ता चार दिवसापूर्वी बंद केला होता. या रागातून जितेंद्रने चिडून त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. डोक्यात, तोंडावर व कपाळावर धारदार हत्यारांने वार केल्याने सुनिल गायकवाड यांचा मृत्यू झाला.

याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपाधीक्षक अजित टीके, ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक नारायण देशमुख यांनी घटनास्थळी पाहणी केली. घटनास्थळी डाॅ.सुनिल यांची दुचाकी रस्त्यावर पडली होती. डॉ. गायकवाड यांचा खून करणारा पुतण्या जितेंद्र गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. रस्त्याच्या वादातून पुतण्याने काकाचा खून केल्याच्या घटनेमुळे बेळंकी परिसरात खळबळ उडाली होती.

Previous Post

सर्वात मोठी बातमी ! राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, देशाच्या राजकारणात खळबळ; नेमकं काय आहे प्रकरण?

Next Post

जेव्हा तहसीलदार स्वतः दिलेल्या निर्णयाची फेरसुनावणी घेऊन निर्णय बदलतात

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जेव्हा तहसीलदार स्वतः दिलेल्या निर्णयाची फेरसुनावणी घेऊन निर्णय बदलतात

जेव्हा तहसीलदार स्वतः दिलेल्या निर्णयाची फेरसुनावणी घेऊन निर्णय बदलतात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Gopniykhabarya Live 2014

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

© Gopniykhabarya Live 2014