• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

शहरात आजपासून दिवसाआड पाणी…

Admin by Admin
April 1, 2022
in सामाजिक
1 min read
0
शहरात आजपासून दिवसाआड पाणी…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पाण्याचा जपून वापर करणे सद्या गरज आहे.

कोल्हापूर: शिंगणापूर योजनेवरील पाणी उपसा यंत्रामध्ये बिघाड झाल्याने या योजनेवरील चार पंपांचा पाणी उपसा कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे ए, बी व ई वॉर्डासह भागात दैनंदिन पाणीपुरवठा पूर्ण क्षमतेने होत नाही.

शिंगणापूर योजनेचा पाणीपुरवठा उद्यापासून (ता. १) एक दिवस आड करण्यात आला आहे. ए, बी, वॉर्डमधील संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड, साने गुरुजी वसाहत, राजेसंभाजी परिसर, क्रशरचौक, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, साळोखेनगर टाकीवरील संपूर्ण भाग, जरगनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, कळंबा फिल्टरवरील अवलंबून संपूर्ण भाग, शिवाजी पेठ परिसरातील काही भाग, संपूर्ण मंगळवार पेठ, विजयनगर, संभाजीनगर, गजानन महाराजनगर, टिंबर मार्केट, मंडलिक वसाहत, मंगेशकरनगर, सुभाषनगर पंपिंगवरील अवलंबून परिसर, शेंडापार्क टाकीवरील अवलंबून परिसर, जवाहरनगर, वाय, पी. पोवारनगर, मिरजकर तिकटी आदी ठिकाणी शुक्रवारी (ता. १) पाणीपुरवठा होईल. त्यानंतर एक दिवसाआड होईल.

संपूर्ण राजारामपुरी पहिली ते तेरावी गल्ली, मातंग वसाहत, यादवनगर, शाहूमिल कॉलनी, उद्यमनगर, शास्त्रीनगर, टाकाळा, साईक्स एक्स्टेंन्शन, पाच बंगला, कोरगावकर परिसर, राजाराम रायफल परिसर, माळी कॉलनी, मोहल्ला परिसर, छत्रपती कॉलनी, दिघे हॉस्पिटल परिसर, पांजरपोळ, सम्राटनगर, प्रतिभानगर, पायमल वसाहत, जगदाळे कॉलनी, आयडियल सोसायटी, तोरणानगर, काशीद कॉलनी, माने कॉलनी, चाणक्यनगर, एसटी कॉलनी, संयुक्त महाराष्ट्र सोसायटी, दौलतनगर, शाहूनगर, राजेंद्रनगर, इंगळे मळा, वैभव सोसायटी, शांतीनिकेतन परिसर, ग्रीनपार्क परिसर, शाहूपुरी पहिली ते चौथी गल्ली, व्यापार पेठ, शिवाजी पार्क, रूईकर कॉलनी, राजीव गांधी वसाहत, लोणार वसाहत, लिशा हॉटेल, महाडिक वसाहत, मार्केट यार्ड आदी ठिकाणी शनिवारी (ता. २) आणि त्या पुढे एक दिवसाआड पाणीपुरवठा होईल. पंप दुरुस्तीचे कामकाज पूर्ण होताच पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असे महापालिकेने म्हटले आहे.

असा होईल पुरवठा

यासाठी ए, बी वॉर्ड व संलग्न उपनगरे, ग्रामीण भागास शुक्रवारी (ता. १) तसेच ई वॉर्ड व संलग्न उपनगरे, ग्रामीण भागास शनिवारी (ता. २) व पुढे याप्रमाणे एक दिवस आड पाणीपुरवठ्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.

Previous Post

शिवसेना, राष्ट्रवादीत मुख्यमंत्री गृहमंत्री पदाच्या अदलाबदलीची शक्यता, बड्या नेत्याचा गौप्यस्फोट..!

Next Post

फी न भरल्याने पेपर हिसकावला, विद्यार्थ्याने जीवन संपवलं, नातेवाईक संतापले, कॉलेजने आरोप फेटाळले..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
फी न भरल्याने पेपर हिसकावला, विद्यार्थ्याने जीवन संपवलं, नातेवाईक संतापले, कॉलेजने आरोप फेटाळले..!

फी न भरल्याने पेपर हिसकावला, विद्यार्थ्याने जीवन संपवलं, नातेवाईक संतापले, कॉलेजने आरोप फेटाळले..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group