• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

शिवसेना, राष्ट्रवादीत मुख्यमंत्री गृहमंत्री पदाच्या अदलाबदलीची शक्यता, बड्या नेत्याचा गौप्यस्फोट..!

Admin by Admin
April 1, 2022
in राजकीय
1 min read
0
जयसिंगपुरात दहावीचा पेपर फुटल्याने एकच खळबळ..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई: केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीतील नेत्यांच्या चौकशा सुरू असताना, ईडीचं धाडसत्र सुरू असताना राजकीय वर्तुळात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत.

दोन्ही नेत्यांमध्ये तासाभरापासून चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक गौप्यस्फोट केला आहे.

शिवसेना गृहमंत्रालयाच्या कारभारावर नाराज असल्याची चर्चा असताना मुनगंटीवार यांनी थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्रिपदाची अदलाबदली केली जाऊ शकते, असं विधान केलं आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला. राष्ट्रवादी मुख्यमंत्रिपदासाठी उत्सुक आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री आणि गृहमंत्रिपदाची केली जाण्याची शक्यता आहे. तशी चर्चा मी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान ऐकली होती, असं मुनगंटीवार म्हणाले.

शिवसेना, मुख्यमंत्री ठाकरे गृह मंत्रालयावर नाराज असल्याचं समजतं. पण त्यांना गृह मंत्रालय का हवंय, हा प्रश्न महत्त्वाचा असल्याचं मुनगंटीवार म्हणाले. ‘महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी, गैरव्यवहार करणाऱ्या माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी शिवसेनेला गृहमंत्रिपद नकोय. त्यांना सूडाचं राजकारण करायचंय. भाजपच्या नेत्यांना अडकवायचं आहे. त्यासाठीच त्यांना गृहमंत्रालय हवं आहे,’ असा आरोप त्यांनी केला.

विद्यमान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सूडानं वागत नसतील, तर ती आनंदाची बाब आहे. त्यासाठी मी त्यांचं आणि राष्ट्रवादीचं अभिनंदन करतो. वळसे पाटील सूडबुद्धीनं वागत नसतील तर त्यात आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही, असंही मुनगंटीवार पुढे म्हणाले.

भाजप खोटारडा पक्ष- मिटकरी
मुनगंटीवार यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘भाजप खोटारडा पक्ष आहे. मुनगंटीवार यांच्या विधानाकडे एप्रिल फूल म्हणून बघा,’ असा टोला त्यांनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस हा सत्तापिपासू पक्ष नाही. तो गुण भाजपमध्ये आहे. मुनगंटीवारांनी आमची काळजी करू नये, अशी टीका मिटकरींनी केली.

Previous Post

रमजान मधील सेहरी आणि इफ्तारची भारतातील वेळा माहिती आहेत का..? जाणून घ्या

Next Post

शहरात आजपासून दिवसाआड पाणी…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
शहरात आजपासून दिवसाआड पाणी…

शहरात आजपासून दिवसाआड पाणी...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group