• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

जतमध्ये बालविवाह प्रकरणी पतीसह, सासू-सासरे आणि आई-वडिलांवर गुन्हा दाखल

Admin by Admin
March 22, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
जतमध्ये बालविवाह प्रकरणी पतीसह, सासू-सासरे आणि आई-वडिलांवर गुन्हा दाखल
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

जत; खबऱ्या प्रतिनिधी: जत तालुक्यातील एका गावात एका १६ वर्षीय मुलीचा विवाह लावल्याप्रकरणी पती, सासू-सासरे, आई-वडील या पाचजणांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

तसेच पतीने वय कमी असल्याचे माहित असतानाही लग्न केले व शारीरिक संबंध ठेवल्याने वयाच्या १७ व्या वर्षी पीडित पत्नीने एका मुलीस जन्म दिला आहे. याप्रकरणी पती विरोधात (पोक्सो) बालअत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद संबंधित पीडित पत्नीनेच पती, सासू सासरे आई-वडील यांच्या विरोधात दिल्याने जत तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, जत तालुक्यातील एका गावात एका अल्पवयीन मुलीचे लग्न ६ जून २०२२ रोजी करण्यात आले होते. पीडित मुलीचे वय कमी असल्याची कल्पना पती सासू-सासरे आई-वडील यांना होती. तरी देखील कायद्याचे उल्लंघन करून बालविवाह करण्यात आला. तसेच पतीने अल्पवयीन पत्नीशी शारीरिक संबंध ठेवले त्यामुळे पीडित अल्पवयीन पत्नीने १९ मार्च २०२३ रोजी एका मुलीस जन्म दिला आहे. हा जन्म एका शासकीय रुग्णालयात झाला आहे. सदरची बाब वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने याबाबतची माहिती त्यांनी पोलिसात दिली. त्यानंतर संबंधित पीडितीने पाच जणाविरुद्ध फिर्याद दिली आहे.

जत तालुक्यातील तिसरी घटना

शासनाने केलेल्या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात अनेक बालविवाह होत आहेत. याबाबत प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारची तालुक्यातील ही तिसरी घटना आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हे दाखल झाल्यास बालविवाहाची संख्या कमी होणार आहे.

Previous Post

मुहूर्ताच्या सौद्यात हळदीला साडेअकरा हजाराचा सर्वोच्च दर

Next Post

सर्वात मोठी बातमी ! राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, देशाच्या राजकारणात खळबळ; नेमकं काय आहे प्रकरण?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पोलिस निरीक्षक निंभोरे साहेब, तालुक्यातील अवैध धंदे अगोदर बंद करा..!

सर्वात मोठी बातमी ! राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, देशाच्या राजकारणात खळबळ; नेमकं काय आहे प्रकरण?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group