• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत दलित महासंघाचा उंट व शेळ्यांसह महापालिकेवर मोर्चा

Admin by Admin
February 22, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
सांगलीत दलित महासंघाचा उंट व शेळ्यांसह महापालिकेवर मोर्चा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : महापालिकेच्या मालमत्ता कर प्रणालीची चौकशी करावी. भ्रष्टाचार आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, घरपट्टी पूर्ण माफ करावी यासह अन्य मागण्यांसाठी मंगळवारी दलित महासंघाच्या वतीने उंट, शेळीसह महापालिकेवर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.

दलित महासंघाचे राज्य संपर्क प्रमुख उत्तम मोहिते, जिल्हाध्यक्षा वनिता कांबळे, जिल्हा संपर्क प्रमुख महेश देवकुळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी कर संकलन अधिकारी तथा सहायक आयुक्त नितीन शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, कोरोना व महापुरामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यात महापालिकेने थकीत घरपट्टीपोटी मालमत्ता जप्ती, नळ कनेक्शन तोडण्याची कार्यवाही हाती घेतली आहे. आधीच आर्थिक स्थितीमुळे नागरिक हैराण असताना पालिकेकडून चुकीच्या पद्धतीने कर आकारणी करण्यात आली आहे. याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे. या मोर्चात प्रवीण वारे, अजित आवळे, सचिन मोरे, मारुती भोसले, सागर कांबळे, महावीर चंदनशिवे, प्रकाश वाघमारे, तेजस मोरे, सोनाली मोहिते यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.

Previous Post

विट्यात राज्य विद्यापीठीय सेवक कृती समितीचे काम बंद आंदोलन

Next Post

जतमध्ये बालविवाह केल्याप्रकरणी पतीविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
खून | जतमध्ये किरकोळ वादातून हाणामारी : एकाचा मृत्यू ; संशयित आरोपी फरार..

जतमध्ये बालविवाह केल्याप्रकरणी पतीविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group