• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

शासकीय रुग्णालय परिसरात रुग्ण हक्क सनदचे अनावरण..

Admin by Admin
February 22, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
शासकीय रुग्णालय परिसरात रुग्ण हक्क सनदचे अनावरण..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली प्रतिनिधी- महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट नियम 2021 मधील तरतुदीनुसार रुग्णांच्या हिताकरिता सर्व हॉस्पिटलच्या दर्शनी भागात रुग्ण हक्काची सनद लावणे, पंधरा प्रकारचे उपचाराचे दर पत्रक लावणे, तक्रार निवारण कक्ष व टोल फ्री नंबर लावणे. याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार आरोग्य हक्क समिती व मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकाराने पद्मश्री वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय परिसरातील दर्शनी भागात रुग्ण हक्काच्या माहिती फलकाचे अनावरण करण्यात आले.

रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीकांत अहंकारी यांच्या हस्ते फीत कापून व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्या हस्ते पॉकेट रुग्णहक्क सनदचे प्रकाशन करून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रभारी वैद्यकीय अधीक्षक अहंकारी म्हणाले “महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट’ याविषयी आम्ही अनभिज्ञ असून, त्याची संपूर्ण माहिती घेऊन अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले.

तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांनी उपचारातील हलगर्जीपणा, रुग्णांशी गैरवर्तन, नियमबाह्य ज्यादा बिल, अपेक्षित सेवा नाकारणे, याबाबत. रुग्ण, सामाजिक संस्था, रुग्णालय प्रशासन, यांच्या समन्वयातून आपण वाटचाल करण्याचे आश्वासन दिले. तसेच आरोग्य हक्क समिती ( जन आरोग्य अभियान) लोकसहभाग लोक पुढाकारातून करीत असलेल्या रुग्णांच्या कायदेशीर जनजागृती उपक्रमाचे कौतुक केले. स्वागत प्रास्ताविक आरोग्य हक्क समितीचे अध्यक्ष शाहीन शेख यांनी केले.

यावेळी राजेश साळुंखे, रमजान खलिफा, हाफिज सद्दाम, इलियास शेख, योगेश रोकडे, शब्बीर कलेगार, समाजसेवा अधीक्षक खाडे , सखी वन स्टॉप सेंटरचे सुरेखा शेख सह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Previous Post

वन विभागातील ५८ लाखांच्या बोगस कामांचा डाव उधळला.

Next Post

बारावी बोर्डाच्या पहिल्याच पेपरमध्ये त्रुटी ; विद्यार्थ्यांना न्याय देणार : शिक्षणमंडळाचे स्पष्टीकरण.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बारावी बोर्डाच्या पहिल्याच पेपरमध्ये त्रुटी ; विद्यार्थ्यांना न्याय देणार : शिक्षणमंडळाचे स्पष्टीकरण.

बारावी बोर्डाच्या पहिल्याच पेपरमध्ये त्रुटी ; विद्यार्थ्यांना न्याय देणार : शिक्षणमंडळाचे स्पष्टीकरण.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group