• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

“मी पोलीस ठाणे खिशात घेऊन फिरतो; भारी भारी लोक माझे नाव ऐकले की टरकतात” पलूस तालुक्यातील सावकाराची धमकी.?

म्हणे माझे दहा टक्क्याचे सावकारकीचे लायसन.?

Admin by Admin
February 21, 2023
in क्राईम, सामाजिक
1 min read
0
“मी पोलीस ठाणे खिशात घेऊन फिरतो; भारी भारी लोक माझे नाव ऐकले की टरकतात” पलूस तालुक्यातील सावकाराची धमकी.?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली प्रतिनिधी / सांगली जिल्ह्यात सावकरांच्या पिळवणुकीने अनेकांचे जीवन उध्वस्त केले आहे.सावकरांच्या जाचाला कंटाळून काहींनी आत्महत्या केल्याचेही समोर आले आहे.

मुळात सावकारांच्या विरोधात तक्रारी देऊनही प्रशासनाकडून ठोस पावलं उचलली जात नसल्याचे दिसते आहे. अशाच मग्रुरीची भाषा वापरत असलेला पलूस तालुक्यातील एक सावकार मोकाट सुटलाय. “शिंदे” सरकारच्या काळात याने नावाचा गैरवापर करीत सावकारी धंदा जोमात सुरू केलाय. पैलवान असणाऱ्या या सावकाराने ताकदीनं पैशांचा वापर ही व्याजांच्या धंद्यात केला आहे. पलूस तालुक्यातील एका पतसंस्थेच्या चेअरमन पुत्राने ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून लोकांच्याकडून 25 ते 30 लाख रुपये शेअर मार्केटमध्ये गुंतवायला लावून त्याचा वापर सावकारी धंद्यात केला असल्याचे समजते आहे. गोरगरीब जनतेच्या जमिनी ही बळकवल्याचे नागरिकांच्यातून बोलले जात आहे.

दुय्यम निबंधकांच्याकडून सावकारी करण्याचे लायसन्स मिळाले, परंतु “माझे दहा टक्क्याचे सावकारी लायसन्स आहे, मला कोणीही अडवू शकत नाही. पोलिसांना मी खिशात घेऊन फिरतो, भारी भारी लोक माझे नाव ऐकलं तर टरकतात..!” असे खुलेआम पुणे बोलणाऱ्या व दहशत माजवणाऱ्या त्या पैलवान सावकार व चेअरमन पुत्रावर कारवाई करावी अशी जनतेतून मागणी होत आहे.

यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रारी देणार असल्याचेही काही सावकार ग्रस्त लोकांच्याकडून सांगण्यात येते. अशा बेलगाम सावकारांना चाप बसवण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे पलूस तालुक्यातील जनतेचे म्हणणे आहे.

Previous Post

शेअर मार्केटद्वारे ज्यादा परताव्याच्या आमिषाने पावणे तीन कोटींची फसवणूक ; तिघेजण ताब्यात

Next Post

मिरजेत शिवसेनेचे दोन्ही गट आमने सामने : जोरदार घोषणाबाजी, बाचाबाची.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेत शिवसेनेचे दोन्ही गट आमने सामने : जोरदार घोषणाबाजी, बाचाबाची.

मिरजेत शिवसेनेचे दोन्ही गट आमने सामने : जोरदार घोषणाबाजी, बाचाबाची.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group