• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या खिशावर डल्ला मारणारा चोरटा सापडला,

"आज काहीतरी माल मिळाला पाहिजे, या अपेक्षेने ओबीसी मेळाव्याची संधी साधून, चक्क चोरी करण्यासाठी सोलापुरातून सांगलीत..? "

Admin by Admin
April 1, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या खिशावर डल्ला मारणारा चोरटा सापडला,
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी /शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या खिशातून 50 हजार रुपयांच्या नोटांचं बंडल चोरणारा भामटा अखेर सापडला आहे.

सांगलीत ओबीसी मेळाव्यादरम्यान भर व्यासपीठावर ही धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं होतं. या चोरट्याला सांगली शहर आणि मिरज पोलिसांनी जेरबंद केलं आहे. ओबीसी समाजाचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगलीमध्ये काही दिवसांपूर्वी ओबीसी मेळावा पार पडला होता. यावेळी वडेट्टीवार स्टेजवर उपस्थित असतानाच चोरट्याने हात साफ केला होता. चोरट्याने शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते यांच्या खिशातील नोटांचे बंडल लांबवले होते. ही घटना कॅमेरामध्ये कैद झाली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करुन चोराचा शोध सुरु करण्यात आला होता.

कोण आहे चोरटा?

भर सभेत गर्दीमध्ये व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या खिशातून नोटांचं बंडल लांबवण्याची हिंमत करणारा चोरटा अट्टल गुन्हेगार आहे. त्याने याआधी अशा प्रकारच्या अनेक चोऱ्या केल्या आहेत. त्याच्यावर गुन्हेही दाखल आहेत. त्याचे वय फक्त 21 वर्ष आहे. तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील आहे. चोरीच्या उद्देशानेच तो सांगलीमध्ये ओबीसी मेळाव्याला आला होता.

नेमकं काय घडलं होतं?

सांगली शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांच्या खिशातील 50 हजार रुपयांच्या नोटांचं बंडल चोरट्याने चोरलं. सांगलीच्या स्टेशन चौकात काँग्रेस नेते, मदत आणि पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या ओबीसी मेळाव्या दरम्यान ही घटना घडल्याचं समोर आलं होतं.

स्टेजवर जाऊन चोरट्याने शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या खिशातून नोटांचं बंडल लांबवण्याची हिंमत केली. व्यासपीठावर असलेल्या गर्दीचा फायदा घेत त्याने नोटा लांबवल्या होत्या. शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

Previous Post

राष्ट्रवादीचा उद्या शिराळ्यात मेळावा

Next Post

गायछापचा वारसदार म्हणून लावला चुना, फेकबुकची मैत्री महागात…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
गायछापचा वारसदार म्हणून लावला चुना, फेकबुकची मैत्री महागात…

गायछापचा वारसदार म्हणून लावला चुना, फेकबुकची मैत्री महागात...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group