Saturday, June 7, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

राष्ट्रवादीचा उद्या शिराळ्यात मेळावा

Admin by Admin
April 1, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
0
राष्ट्रवादीचा उद्या शिराळ्यात मेळावा

शिराळा: खबऱ्या प्रतिनिधी/ राष्ट्रवादीतर्फे शनिवारी शिराळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा व पक्षप्रवेश कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.

आमदार नाईक म्हणाले, यावेळी वारणा डावा प्रकल्पासाठी 300 कोटी, वाकुर्डे बु. योजनेस 300 कोटी व वारणा धरण गळती प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी 54 कोटी रुपये, अशी एकूण 654 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात जलसंपदा विभागामार्फत केल्याबद्दल जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांचा नागरी सत्कार होणार आहे.

माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक कार्यकर्त्यांसमवेत भाजपातून राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. यानिमित्ताने शेतकरी मेळावा होणार आहे. अध्यक्षस्थानी खासदार श्रीनिवास पाटील आहेत. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार अरुण लाड, आमदार सुमन पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, फतेसिंगराव नाईक सह. दूध संघाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक उपस्थित राहणार आहेत. शिराळा येथील शिवछत्रपती विद्यालयाच्या पटांगणावर सकाळी साडेनऊ वाजता मेळावा सुरू होईल.

नाईक म्हणाले, भाजपामधून ज्येष्ठ नेते शिवाजीराव नाईक हे राष्ट्रवादीत त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत प्रवेश करत आहेत. त्यामुळे मतदारसंघात पक्षाची ताकद आणखी वाढणार आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत आदी निवडणुकांमध्ये याचा फायदा होणार आहेत. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा जिल्ह्यात पक्षाला होईल. मेळाव्यास मतदार संघातील शेतकरी, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे.

Previous Post

सांगली | सहा लाखांची लाच मागणारा तलाठी अटकेत, महसूल मधील काहीजण एसीबीच्या रडारवर…?

Next Post

शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या खिशावर डल्ला मारणारा चोरटा सापडला,

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या खिशावर डल्ला मारणारा चोरटा सापडला,

शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या खिशावर डल्ला मारणारा चोरटा सापडला,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Gopniykhabarya Live 2014

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

© Gopniykhabarya Live 2014