कडेगाव:-जिल्हा तलाठी व संवर्ग अधिकारी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक लागली होती या निवडणुकीत कडेगाव तालुक्यातील तलाठी संघटनेचे अध्यक्ष वैभव तारळेकर निवडून आल्याने त्यांचा तलाठी संघटनेने सत्कार आयोजित केला होता. कडेगाव च्या तहसीलदार डॉ शैलजा पाटील यांच्या हस्ते तर निवासी नायब तहसीलदार विलास भिसे यांच्या उपस्थितीत हा सत्कार घेण्यात आला.यावेळी नायब तहसीलदार सागर कुलकर्णी उपस्थित होते.
या निवडणुकीत विरोधकांचा पराभवाची धूळ चारत सत्तारूढ पॅनलचे सर्व सदस्य निवडून आले त्यामुळे सन २०२२ ते २०२७ पर्यंत या पॅनलची एक हत्ती सत्ता राहणार आहे. सत्कारावेळी तारळेकर म्हणाले, सभासदांनी सत्तारूढ पॅनलच्या उमेदवारांवरती जो विश्वास दाखवला त्यास कधीही तडा नऊ देणार नाही तसेच सर्वोतोपरी सहकार्य करू.पतसंस्था प्रगती पथावर घेऊन जाण्यासाठी आवश्यक ते योगदान देऊ.
यावेळी कडेगाव तहसीलचे सर्व कर्मचारी, तलाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

