• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

“त्या” प्रकरणात पत्रकार कायद्यांतर्गत होणार कारवाई ; पालकमंत्र्यांनी दिली माहिती.

Admin by Admin
February 10, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, माफ करा स्पष्ट बोलतो, राजकीय, विशेष, शैक्षणिक, शोध पत्रकारिता, सामाजिक
1 min read
0
“त्या” प्रकरणात पत्रकार कायद्यांतर्गत होणार कारवाई ; पालकमंत्र्यांनी दिली माहिती.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रत्नागिरी; खबऱ्या प्रतिनिधी : राजापूर येथे दुचाकीला धडक देऊन पत्रकाराला ठार मारल्याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर याच्यावर पत्रकार कायद्यान्वयेही कारवाई करण्यात येणार आहे.

या गंभीर घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांकडे (डीवायएसपी) सोपवण्यात आला असल्याची माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

या घटनेला जबाबदार असणार्‍या गुन्हेगारांना पाठीशी घातले जाणार नाही. पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी सरकार असून, त्यांच्यासाठी जे करणे शक्य आहे ते सर्व केले जाईल, असेही ना. सामंत यांनी स्पष्ट केले.

रत्नागिरी दौर्‍यावर आलेल्या पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, झालेली घटना अत्यंत गंभीर आहे. हा प्रकार समजल्यानंतर आपण तत्काळ याची माहिती घेतली व पोलिसांनी गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्याची सूचना केली. या प्रकरणाची आपण सातत्याने माहिती घेत आहोत. रिफायनरीला पाठिंबा किंवा विरोध हा लोकशाही मार्गाने मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार असून, तो मांडू शकतो. परंतु ही घटना अत्यंत वाईट आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांनी संबंधित गुन्हेगारावर तत्काळ गुन्हा?दाखल करून कारवाई केली. यात लागलीच खुनाचा गुन्हा दाखल करताना 302 कलम लावण्यात आले आहे.

या प्रकरणात सखोल चौकशी केली जाणार आहे. पत्रकार कायद्यांतर्गत शासन निर्देशाप्रमाणे आता पुढील कारवाई होणार असून, याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांकडे तपास सोपवण्यात आला असल्याची माहितीही ना. सामंत यांनी दिली.

संशयित पोलिस कोठडीतून जिल्हा रुग्णालयात

पोलिस कोठडीमध्ये असलेला संशयित पंढरीनाथ आंबेरकर याला छातीत दुखू लागल्याने आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने त्याला बुधवारी दुपारनंतर जिल्हा रुग्णालयात पोलिसांच्या बंदोबस्तात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिस यंत्रणा आता पुरावे गोळा करू लागली आहे.

Previous Post

अखेर “त्या” शेतकऱ्यास मिळाली रीतसर वीज जोडणी ; अधिकाऱ्यांसमोर इंग्रजीतून मांडल्या होत्या समस्या..!

Next Post

पलूस तहसीलचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पलूस तहसीलचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

पलूस तहसीलचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group