सांगली :खबऱ्या प्रतिनिधी / भाजपाच्या सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्षांच्या दिराकडून एका महिलेचा विनयभंग करण्यात आला आहे.
याबाबत पीडित महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू कोरे असे संशयितांचं नाव असून तो भाजप नेता आणि माजी सरपंच आहे. पीडितेच्या तक्रारीवरुन विश्रामबाग पोलीसांनी राजू कोरेवर गुन्हा दाखल केला आहे.
राजू कोरेंच्या अटकेसाठी सर्वजण आक्रमक….
संशयित राजू कोरेला अटक करण्यासाठी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे प्रमुख नितिन चौगुले यांनी सांगलीचे एसपी दीक्षित गेडाम यांना निवेदन दिले आहे. राजू कोरे यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. राजू कोरे यांनी अनेक महिलांच्याबाबत असे प्रकार केल्याचा आरोप शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने दिला आहे.
शासकीय बंगल्यात महिलांशी गैरप्रकार…?
राजू कोरे यांची वहिनी जिल्हा परिषद अध्यक्षा असताना त्यांच्या शासकीय बंगल्यात सुद्धा महिलांशी गैरप्रकार आणि मारामारी होत असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपी राजकुमार कोरे याला लवकरच अटक केली जाईल असे विश्रामबाग पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

