• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली एलसीबीच्या टीमची कर्तबगारी ; चाणाक्ष पोलिसांनी दरोडेखोरांना केली जेलची वारी..!

महिलेचा खून करून लूट; दरोडेखोरांच्या टोळीला अटक..!

Admin by Admin
February 7, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली एलसीबीच्या टीमची कर्तबगारी ; चाणाक्ष पोलिसांनी दरोडेखोरांना केली जेलची वारी..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी /शिराळा तालुक्यातील निगडी गावातील वस्तीवर दरोडा टाकून महिलेचा खून केल्या प्रकरणी तिघांच्या टोळीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली.

दरोडेखोरांकडून चोरीत लंपास केलेले तीन लाखाचे सोन्याचे दागिनेही हस्तगत करण्यात आले आहेत.

याबाबत माहिती अशी की, निगडी गावामध्ये वस्तीवर असलेल्या सदाशिव साळुंखे यांच्या वस्तीवर १७ जानेवारी रोजी अज्ञात टोळीने दरोडा टाकून हिराबाई साळुंखे यांच्या अंगावरील सहा तोळे सोन्याचे दागिने लंपास केले होते. यावेळी दरोडेखोरांनी धारदार हत्याराने वार केल्याने साळुंखे पती-पत्नी जखमी झाले होते. उपचार सुरू असताना महिलेचा रूग्णालयात मृत्यू झाला होता.

या दरोड्याचा कसून तपास करण्याचे निर्देश आदेश देण्यात आले होते. पोलीस निरीक्षक सतीश शिंंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे चाणक्य व धाडसी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह पथक कारागृहातून बाहेर आलेले संशयितावर नजर ठेवून असताना पोलीस कर्मचारी सुनील चौधरी, उदयसिंह माळी, संकेत कानडे यांना संशयिताबाबत माहिती मिळाली. त्यांनी इस्लामपूरजवळ लक्ष्मी फाटा येथे मगर्‍या अशोक उर्फ अजितबाबा काळे (वय 19 रा. येवलेवाडी) तक्षद उर्फ स्वप्नील पप्प्या काळे (वय २६ रा. कार्वे) आणि गोपी उर्फ टावटाव त्रिशूल उर्फ तिरश्या काळे (वय १९ रा.ऐतवडे) या तिघांना अटक केली. या संशयितांची झडती घेतली असता निगडी येथून दरोडा टाकून लंपास केलेले सहा तोळे वजनाचे दागिने, १० हजार ६०० रूपये रोख मिळाले. या टोळीने कासेगाव, आष्टा व इस्लामपूरमध्येही जबरी चोर्‍या केल्याची कबुली दिली असल्याचे अधिक्षक तेली यांनी सांगितले. दरोड्यासाठी वापरण्यात आलेली दुचाकीही पोलीसांनी हस्तगत केली आहे.

Previous Post

बिअर शॉपीच्या बोगस परवान्याचा मुद्दा तापला! ग्रामस्थांमधून कारवाईची मागणी

Next Post

मेगा ब्लॉकमुळे ९ रोजी कोयना एक्सप्रेस रद्द

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मेगा ब्लॉकमुळे ९ रोजी कोयना एक्सप्रेस रद्द

मेगा ब्लॉकमुळे ९ रोजी कोयना एक्सप्रेस रद्द

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group