• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

तरुणाचे खोटे लग्न लावून देऊन पाच लाखांची फसवणूक

Admin by Admin
February 6, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
तरुणाचे खोटे लग्न लावून देऊन पाच लाखांची फसवणूक
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विटा; खबऱ्या प्रतिनिधी: खोटे लग्न लावून तब्बल ५ लाख रूपयांची फसवणूक करणाऱ्या पाच जणांच्या विरोधात विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दीपक शिवाजी सावंत ( वय ३९, बामणी, ता.खानापूर ) या तरूणाने विटा पोलिसात फिर्याद दिली आहे.

विटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खानापूर तालुक्यातील बामणी येथील दीपक सावंत या तरुणाच्या लग्नासाठी वधू शोध सुरु होता. या गोष्टीचा गैरफायदा घेत अंजना दिलीप मलाईगोल (रा. हुपरी, कोल्हापूर), शिवानंद मठपती स्वामी आणि त्याची पत्नी (रा. गोकाक, बेळगाव) तसेच उमेश वाजंत्री एक स्थळ सुचवले. त्यानुसार त्यांनी दीपकचे लक्ष्मी मल्लाप्पा नलवडे (बैलहुंगल, कर्नाटक) हिच्याशी १७ नोव्हेंबर २०२२ रोजी लग्न लावून दिले. मात्र त्यावेळी दीपकचा विश्र्वास संपादन करून लक्ष्मी हिच्याशी खोटे लग्न लावताना रोख ३ लाख १० हजार रुपये आणि १ लाख ५९ हजार ९३२ रूपये किंमतीचे सोने असे एकूण ४ लाख ६९ हजार ९३२ रूपयांचा ऐवज दीपककडून घेतला. यानंतर पुढच्या सात दिवसात संशयितांनी तेथून पलायन केले. याबाबत दीपक सावंत यांनी या पाचजणांच्या विरोधात आर्थिक फसवणूकीची फिर्याद दिली असून त्यावरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Previous Post

सुशांत खिल्लारे खून प्रकरणी सांगलीचे दोघे ताब्यात : आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी.

Next Post

मोठी बातमी | काँग्रेसमध्ये मोठा भूकंप; बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी | काँग्रेसमध्ये मोठा भूकंप; बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा.

मोठी बातमी | काँग्रेसमध्ये मोठा भूकंप; बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group