• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत बनावट सोने गहाण ठेवून तेरा लाखाची फसवणूक

Admin by Admin
February 6, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत बनावट सोने गहाण ठेवून तेरा लाखाची फसवणूक
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

जत: माडग्याळ (ता.जत ) येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत बनावट सोने गहाण ठेवून १३ लाख २१ हजार तारण कर्ज उचलल्याची गंभीर बाब जिल्हा बँकेच्या निदर्शनास आली आहे.

याबाबत सात कर्जदारासह व खोटे मूल्यांकन करणाऱ्या सराफासह उमदी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबतची फिर्याद बँकेचे विभागीय अधिकारी राजेंद्र नाटेकर यांनी उमदी पोलिसात दिली आहे.

याप्रकरणी श्रीकांत गोविंद हुवाळे (रा.व्हसपेठ )दिलीप सुखदेव सावंत (रा.माडग्याळ ), मच्छिंद्रनाथ शाहू सावंत (माडग्याळ), शहाजी मारुती तुराई (रा.राजोबाचीवाडी) धुडाप्पा भीमराव गावडे (रा. सोरडी), अंकुश रामू घोदे (रा.व्हसपेठ) सिद्धू रतन शिंदे (रा.राजोबाचीवाडी) व मूल्यांकन करणारे सुवर्णकार संजय विठ्ठल सावंत (रा.माडग्याळ)असे आठ जणावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे .

याबाबत अधिक माहिती अशी, माडग्याळ येथील जिल्हा मध्यवर्तीच्या शाखेत सराफ (व्हॅल्युशन) मूल्यांकन करण्याकरिता संजय विठ्ठल सावंत या सुवर्णकाराची नेमणूक केली होती. त्यांनी बँकेकडे सोने तारण साठी आलेल्या सात जणांचे बनावट असलेले सोने चोख सोने असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे बँकेने त्यांना ७ जणांना १३ लाख २१ हजाराची कर्जाऊ रक्कम तारण कर्ज म्हणून दिले आहे. याबाबत जिल्हा बँकेने सोने जिन्नस क्रॉस पडताळणी करिता श्रीशैल विठ्ठल आरगोडी यांची नेमणूक केली आहे. यावेळी सदरचे ९ जिन्नस बनावट असल्याचे दिसून आले. याबाबतचा पत्रव्यवहार जिल्हा बँकेचे सर -व्यवस्थापक यांच्याकडे करण्यात आला यावेळी सर्व व्यवस्थापक यांनी संबंधितावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले त्यानुसार सोने तारण कर्जदार कंसात फसवणूक केलेली रक्कम श्रीकांत गोविंद हुवाळे (८५०००), दिलीप सुखदेव सावंत (१६००००), मच्छिंद्रनाथ शाहू सावंत (१५०,०००), शहाजी मारुती तुराई (५६५०००) धुडाप्पा भीमराव गावडे (१५१०००), अंकुश रामू घोदे (६००००) सिद्धू रतन शिंदे (१५००००) असे एकूण पंधरा लाख हुन अधिक रकमेचे सोने गहाण ठेवले आहे त्याचे सरासरी ८० टक्के प्रमाणे १३ लाख २१ हजार करून त्यांना कर्ज दिले आहे सदरची फसवणूक सराफ व कर्जदार यांनी केल्याचे लक्षात आले . याबाबतची फिर्याद बँकेचे तालुका विभागीय अधिकारी राजेंद्र नाटेकर यांनी उमदी पोलिसात दिली आहे. या घटनेचा अधिक तपास उमदी पोलीस करत आहेत.

Previous Post

धर्मांतराचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार; चौघे गजाआड

Next Post

“आता नंबर बापटांचा का…?” भाजपच्या उमेदवारीवरून लागले पोस्टर.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
“आता नंबर बापटांचा का…?” भाजपच्या उमेदवारीवरून लागले पोस्टर.

"आता नंबर बापटांचा का...?" भाजपच्या उमेदवारीवरून लागले पोस्टर.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group