• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

जितेंद्र आव्हाड यांनी तोंडाला लगाम घालावा ; त्यांना कृपामाई या वेड्यांचे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करू : भाजप युवा मोर्चाचे पदाधिकाऱ्यांनी केला निषेध व्यक्त.

Admin by Admin
February 5, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
जितेंद्र आव्हाड यांनी तोंडाला लगाम घालावा ; त्यांना कृपामाई या वेड्यांचे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करू : भाजप युवा मोर्चाचे पदाधिकाऱ्यांनी केला निषेध व्यक्त.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी / मिरज शहरातील आमदार सुरेश खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर आज भाजपच्या युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांनी आव्हाड यांचा निषेध व्यक्त केला. “अफजल खान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत” या जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यानंतर मिरजेत भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पोस्टरवर शाई ओतून निषेध व्यक्त केला.

राष्ट्रवादीचे पदाधिकारी नेहमीच वादग्रस्त व बेताल वक्तव्य करीत असल्याचा प्रत्यय येत आहे. सांगली मिरज रोड वरील कृपामाई या वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना आम्ही ऍडमिट करू, त्यांच्यावर उपचार होणे गरजेचे आहे, असे भाजपचे पदाधिकारी दिगंबर जाधव यांनी निषेध प्रसंगी सांगितले.

https://gopniykhabarya.live/wp-content/uploads/2023/02/VID20230205135327.mp4

यावेळेस भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा प्रदेश सचिव सागर व्हणकडे, उमेश हारगे, सुमित ठाणेदार, संदीप सलगर, अवधूत जाधव, संजय वाले यांच्यासहित कार्यकर्ते उपस्थित होते.

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड.?

“अफजल खान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना! तुम्ही मुलांचा इतिहास काढल्यावर कसं चालेल”, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. ते पुण्यातील एका कार्यक्रमात बोलले होते. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. “तुम्ही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला मुस्लिम वस्त्यांमध्ये जाऊन बघा, किती उत्साहाचे वातावरण असते. मुसलमान वस्तीत उत्साह असतो. त्यांच्या मनात भीती असते अस्तित्वाची. त्यांना सिद्ध करावं लागतं की ते भारतीय आहेत किती वर्ष त्यांच्याकडे पुरावा मागणार?”, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी भर कार्यक्रमांमध्ये भाजपला केला. यानंतर आज मिरज मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आव्हाड यांच्या पोस्टरवर शाई ओतून पायाखाली तुडवून निषेध व्यक्त केला.

Previous Post

मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्यासाठी टास्क फोर्स नेमणार :- मॅटच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही.

Next Post

मिरजेत डॉ. कांबळेंनी दिले रेकॉर्डिंगचे इंजेक्शन..! इनामदारांना राष्ट्रवादी पक्षाचे इन्फेक्शन.?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेत डॉ. कांबळेंनी दिले रेकॉर्डिंगचे इंजेक्शन..! इनामदारांना राष्ट्रवादी पक्षाचे इन्फेक्शन.?

मिरजेत डॉ. कांबळेंनी दिले रेकॉर्डिंगचे इंजेक्शन..! इनामदारांना राष्ट्रवादी पक्षाचे इन्फेक्शन.?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group