• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

१० हजार रुपये लाच घेताना पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात.

Admin by Admin
January 27, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
१० हजार रुपये लाच घेताना पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पुणे : खबऱ्या ऑनलाईन/ प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी १० हजार रुपये लाच स्वीकारताना पुणे ग्रामीण पोलीस दलातील वालचंदनगर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले.

मोहन मल्हारी ठोंबरे असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे. पुणे एसीबीने ही कारवाई शुक्रवारी (दि.२७) वालचंदनगर पोलीस ठाण्यात केली.

याबाबत ३४ वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबीकडे शुक्रवारी तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्याविरुद्ध वालचंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे. दाखल तक्रारीमध्ये प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी तसेच गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलीस हवालदार मोहन ठोंबरे यांनी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली.

पुणे युनिटने पंचासमक्ष पडताळणी केली असता मोहन ठोंबरे यांनी प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी व मदत करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

पथकाने वालचंदनगर पोलीस ठाण्यात सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम घेताना मोहन ठोंबरे यांना रंगेहात पकडण्यात आले. ठोंबरे यांच्यावर वालचंदनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे.पुढील तपास पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर करत आहेत.

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

Previous Post

प्रजासत्ताकदिनी राज्यातील १८९ कैद्यांची कारागृहातून झाली सुटका

Next Post

भाजप पुन्हा उद्धव ठाकरेंना ‘टाळी’ देण्याच्या तयारीत!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
भाजप पुन्हा उद्धव ठाकरेंना ‘टाळी’ देण्याच्या तयारीत!

भाजप पुन्हा उद्धव ठाकरेंना ‘टाळी’ देण्याच्या तयारीत!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group