• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीची छेडछाड, मारहाण ; दोघांवर गुन्हा दाखल.

Admin by Admin
January 26, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीची छेडछाड, मारहाण ; दोघांवर गुन्हा दाखल.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जत : खबऱ्या प्रतिनिधी /सांगली शहरातील एका महाविद्यालयाच्या मैदानावर पोलीस भरतीचा सराव करण्यास जाणाऱ्या एका मुलीची छेडछाड करून तिला आणि तिच्या भावाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बुधवारी सायंकाळी 6 वाजता ही घटना घडली आहे. याबाबत जत पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पीडित मुलीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी आकाश शिवाजी हवीनाळ आणि प्रेम सुंदर तुपसौंदर्य (दोघे रा. इंदिरा नगर, जत) यांच्या विरोधात विनयभंग आणि मारहानीचा गुन्हा दाखल केला आहे. अद्याप यातील आरोपींना पोलिसांनी अटक केलेली नव्हती. पोलिसांनी व पीडित मुलीच्या पालकांनी दिलेली माहिती अशी की, पीडित मुलगी येथील महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. सायंकाळी 6 वाजता ती व तिचा लहान भाऊ इंदिरा नगर रोडवरून राजे रामराव उच्च महाविद्यालय येथे पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी निघाले होते.

वरील संशयित आरोपींनी पीडित मुलीला निजर्नस्थळी गाठत तिला अश्लील शब्द प्रयोग करत तिचा पाठलाग केला. मुलीने प्रत्युत्तर देताना तिची छेडछाड करण्यास सुरुवात केली. तिला छेडछाड करताना तिचा लहान भाऊ मध्ये आला. त्या दोघांनी त्यालाही मारहाण केली. मारहाण होत असताना पीडित मुलीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.

परिसरातील लोक जमा होताना दोघांनीही घटनास्थळावरून पळ काढला. पीडित मुलीने ही घटना घरच्यांना सांगितली. नंतर घरच्यांनी जत पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. भर दिवसा ही घटना घडल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. याचा अधिक तपास जत पोलीस करत आहेत.

Previous Post

पुणे विभागाचा उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी पुरस्कार गणेश मरकड यांना प्रदान

Next Post

मिरजेत तृतीपंथीयाच्या हस्ते ध्वजारोहण.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेत तृतीपंथीयाच्या हस्ते ध्वजारोहण.

मिरजेत तृतीपंथीयाच्या हस्ते ध्वजारोहण.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group