• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अनेक पैलवानांवर अन्याय; चंद्रहार पाटील यांची टीका

Admin by Admin
January 23, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अनेक पैलवानांवर अन्याय; चंद्रहार पाटील यांची टीका
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली; खबऱ्या प्रतिनिधी: महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अनेक पैलवानांवर अन्याय केला जात आहे. सध्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील वादविवाद चव्हाट्यावर येत आहेत.

कुस्तीगीर परिषदेने मान्यता दिल्यास विना वादविवाद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेऊन विजेत्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी सांगलीत पत्रकार बैठकीत जाहीर केले.

पै. चंद्रहार पाटील म्हणाले, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत आता वादविवाद होऊ लागले आहेत. अनेक पैलवानांवर अन्याय देखील केला जात आहे. सन 2003 साली यवतमाळ येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील माझ्यावर अन्याय झाला होता. कुस्ती झाल्याच्या दुसऱ्या दिवशी प्रतिस्पर्धी मल्ल्याच्या बाजूने निकाल देण्यात आला होता. तसेच सन 2009 मध्ये पुणे येथील महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मला हरविण्यासाठी सहा मिनिटांची कुस्ती तब्बल दीड तास चालविण्यात आली. ज्या कुस्तीमध्ये मी डाव टाकला असताना देखील प्रतिस्पर्धी मल्लास गुण देण्यात आले होते. सांगली जिल्ह्यात तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा आणू नये यासाठी माझ्यावर हा अन्याय करण्यात आला आहे.

भारतातील सर्वात मोठ्या राष्ट्रकुल कुस्ती आखाडा सांगलीत

पै. पाटील म्हणाले, चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून विटा येथे तीन एकर जागेत भारतातील सर्वात मोठी राष्ट्रकुल कुस्ती आखाड्याचे काम सुरू आहे. ज्यामध्ये पाचशे पैलवानांची राहण्याची व्यवस्था, आत्याधुनिक मॅट हॉल, माती आखाडा, जिम स्विमिंग टॅंक, लायब्ररी, लेक्चर हॉल, गेस्ट हाउस, कोचेस कॉटर, हॉस्पिटल मॉल इत्यादी 22 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत आहेत. या ठिकाणी सध्या 50 मुले सराव करीत आहेत. त्यामुळे कुस्तीगीर परिषदेने मान्यता दिल्यास सांगलीमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवण्यात येतील. विजेत्या पैलवानास चांदीची गदा व एक कोटी रुपये बक्षीस देण्यात येणार असल्याचेही पै. पाटील यांनी यावेळी सांगितले.

मी आत्महत्येच्या विचारात होतो..

भविष्यात कोणत्याही पैलवानावर अन्याय होणार नाही यासाठी चंद्रहार पाटील युथ फाउंडेशन काम करेल. महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत माझ्यावर अन्याय झाल्याने माझ्यावर आत्महत्या करण्याची देखील मनात भावना निर्माण झाली होती. परंतु मी अन्याय पचवला आहे. पैलवानावर होणारा अन्याय मला माहित असल्याने यापुढे कोणत्याही पैलवानावर अन्याय होणार नाही, याची दक्षता चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशन घेईल.

Previous Post

महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना लागू होणार? मुख्यमंत्र्यांनी दिला दिलासा

Next Post

सांगली | बहाद्दर सराईताने चोरल्या १२ दुचाकी ;अन् केल्या १० घरफोड्या..! स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आवळल्या नाड्या..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | बहाद्दर सराईताने चोरल्या १२ दुचाकी ;अन् केल्या १० घरफोड्या..! स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आवळल्या नाड्या..?

सांगली | बहाद्दर सराईताने चोरल्या १२ दुचाकी ;अन् केल्या १० घरफोड्या..! स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आवळल्या नाड्या..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group