• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | एवढे पैसे कुठून आणले म्हणून इन्कम टॅक्स तुमचीच चौकशी करेल ; फसवणूक झालेल्या महिलांना नेत्याची दमबाजी.

Admin by Admin
January 21, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
जयंतरावांना एकनाथ शिंदे सरकारचा आणखी एक धक्का ; “जिल्हा मध्यवर्ती बँकेतील…….!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

इस्लामपूर खबऱ्या प्रतिनिधी : शेअर मार्केटमध्ये लाखो रुपये गुंतवलेल्या कडेगाव तालुक्यातील महिलांनी एकत्रित येत नेर्लेतील एका एजंटाला गाठले आणि सर्वांसमोर खरडपट्टी काढली.

आक्रमक झालेल्या या महिलांसमोर त्या एजंटाची बोबडी वळली. मात्र, त्या वेळी एजंटाच्या समर्थनार्थ आलेल्या एका स्थानिक नेत्याने एजंटाची बाजू घेत महिलांची व स्थानिक गुंतवणूकदारांची उलटतपासणी केली. ‘एवढे पैसे कोठून आले,’ असे म्हणत ‘प्राप्तिकर विभाग तुमचीच चौकशी करेल,’ असे सांगून महिलांना उपदेशाचा डोस पाजला. यावर शिव्यांची लाखोली वाहत ‘देव बघून घेईल,’ असे म्हणत महिला निघून गेल्या.

शेअर मार्केटमध्ये नेर्लेतील अनेकांनी संबंधित व्यक्तीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. गुंतवणुकीच्या परताव्याबाबत गुंतवणूकदारांनी विचारणा केली असता, त्यांनाच प्राप्तिकर विभागाकडून तपासणी होण्याची भीती घालत विषय बंद करा, असा निरोपच स्थानिक म्होरक्याकडून दिला जात आहे. पोलिसांत तक्रार केल्यास नागरिकांना गंडा घालून आर्थिक फसवणूक करणारे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

गुंतवणुकीची रक्कम अधिक असल्याने केलेल्या उचापतीचा भांडाफोड होण्याच्या भीतीने राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे स्थानिक राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप करून ही नामी शक्कल काढल्याने पोलिस ठाण्याच्या वाटेवर असणारे अनेकजण पुन्हा मागे फिरल्याच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. मोठ्या आर्थिक लालसेच्या हव्यासापोटी कडेगाव तालुक्यातील अनेक व्यावसायिक, राजकीय पुढऱ्यांनी शेअर मार्केटमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. यासंबंधी म्होरक्यानेच पैसे घेऊन पोबारा केला आहे. शेअर मार्केटमध्ये नेमकी किती गुंतवणूक झाली, नेमक्या किती लोकांची फसवणूक झाली आहे, याबाबत स्थानिक पोलिसांत तक्रार झाल्यानंतरच उघड होणार आहे.

फसवेगिरीत नेत्यांचाही हात

कडेगाव तालुक्यातील दोन व्यक्तींनी मुंबई पाठोपाठ इस्लामपुरातही दिमाखदार कार्यालय थाटले होते. या दोघांनी तालुक्यातील दुसऱ्या फळीतील राजकीय नेत्यांना हाताशी धरून मध्यस्थामार्फत सावज हेरले. अनेक जणांनी बँका, पतसंस्थेचे कर्ज घेऊन, सोने गहाण ठेवून ही रक्कम त्याच्यामार्फत नोटरी करून दिली. आज रोजी ती व्यक्तीच कार्यालय बंद करून पसार झाली आहे. त्यामुळे झटपट श्रीमंत होण्याच्या लालसेने हे गुंतवणूक करणारे तोट्यात गेले आहेत.

‘न घाबरता तक्रार करा’

शेअर मार्केटमध्ये कोणाची फसवणूक झाली असेल, तर संबंधितांनी न घाबरता पोलिस आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधून तक्रार दाखल करावी. तांबवे, बहे, नेर्ले, कामेरी, पेठ, बोरगाव या गावांतील नागरिकांनी कमी रक्कम असेल, तर इस्लामपूर पोलिस ठाणे व मोठी रक्कम असेल तर आर्थिक गुन्हे शाखा सांगलीत तक्रार दाखल करावी, असे आवाहन सांगली आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांनी केले.

Previous Post

पुणे ग्रामीण पोलीस दलातील १२ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या.

Next Post

उद्धव ठाकरे ,एकनाथ शिंदे तिकडे भांडत बसले, इकडे “शिवसेना” नाव मुलीला मिळाले. वाचा सविस्तर नेमकं काय घडलं..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
उद्धव ठाकरे ,एकनाथ शिंदे तिकडे भांडत बसले, इकडे “शिवसेना” नाव मुलीला मिळाले. वाचा सविस्तर नेमकं काय घडलं..?

उद्धव ठाकरे ,एकनाथ शिंदे तिकडे भांडत बसले, इकडे "शिवसेना" नाव मुलीला मिळाले. वाचा सविस्तर नेमकं काय घडलं..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group