• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली : चारचाकीच्या धडकेत अंत्यविधीसाठी चाललेल्या ३ महिलांचा मृत्यू..

Admin by Admin
January 21, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली : चारचाकीच्या धडकेत अंत्यविधीसाठी चाललेल्या ३ महिलांचा मृत्यू..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी : नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी चालत जाणाऱ्या तीन महिलांना मागच्या बाजूने चारचाकीने उडवल्याने तिघींचाही मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे. सायंकाळी ५ च्या सुमारास रामनगरजवळ धारवाड-गोवा मार्गावार हा अपघात घडला.

चारचाकी मूळची तामिळनाडूची असून, त्यातून एक कुटुंब सहलीसाठी तमिळनाडूहून गोव्याकडे जात होते. सायंकाळच्या वेळी डोळ्यांवर सूर्यकिरणे पडल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.

कल्पना कुमान्ना गावडे (वय ४४), पार्वती चुडाप्पा गावडा (६०),पार्वती भुजंग फोंडशेकर (६६) अशी मृतांची नावे असून, त्या तिघाही खानापूर तालुक्यातील घार्ली गावच्या आहेत. विपिन तिळवे (रा. रामनगर) असे जखमीचे नाव आहे. जखमीवर रामनगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी लोकांनी गर्दी केली होती.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार : खानापूर तालुक्यातील घार्ली गावातील महिला जवळच असणाऱ्या गवेगाळी गावातील एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जात होत्या. घार्ली गावातून त्या क्रुझरने रामनगरपर्यंत आल्या. तेथून पुढे त्या धारवाड – गोवा महामार्गावरून चालत जात होत्या. त्याचेवळी तामिळनाडू येथून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या महिंद्रा बोलेरो चारचाकी वाहनाने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिल्याने तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. त्याचबरोबर रामनगरमध्ये पिग्मी कलेक्टरचे काम करणारे तिळवे हेही जखमी झाले.

गोव्याकडे जात असतना मावळतीच्या सूर्याची किरणे चारचाकी वाहनाच्या काचेतून डोळ्यांवर पडल्याने समोरचे काहीच दिसले नाही, असे कारण चारचाकी वाहनचालकाने पोलिसांना सांगितले.

Previous Post

मिरजेतील “त्या” वादग्रस्त जागेबाबत तब्बल ४ तास सुनावणी : “या” दिवशी निकाल.!

Next Post

सांगलीत धीरज सूर्यवंशी – अतुल माने यांच्यात हाणामारी.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीत धीरज सूर्यवंशी – अतुल माने यांच्यात हाणामारी.

सांगलीत धीरज सूर्यवंशी - अतुल माने यांच्यात हाणामारी.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group