• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेतील “त्या” वादग्रस्त जागेबाबत तब्बल ४ तास सुनावणी : “या” दिवशी निकाल.!

Admin by Admin
January 20, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, विशेष, सामाजिक
1 min read
0
मिरजेतील “त्या” वादग्रस्त जागेबाबत तब्बल ४ तास सुनावणी : “या” दिवशी निकाल.!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज :खबऱ्या प्रतिनिधी / संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या मिरजेतील तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार कुंभार यांच्या समोरील सुनावणी आज पूर्ण झाली. मिरजेत ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह जमावाने दुकाने पाडल्याप्रकरणी मिरज तहसीलदारांनी ताब्यात घेतलेल्या वादग्रस्त जागेबाबत शुक्रवारी सायंकाळी पुन्हा सुनावणी झाली. जवळपास चार तास सुनावणी सुरू होती. दोन्ही पक्षकारांच्या वकिलांनी कागदपत्रे सादर केली. संपूर्ण सुनावणी पूर्ण झाली. मात्र, तहसीलदार तथा दंडाधिकारी यांनी अद्याप निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी मिरजेत बसस्थानका जवळ वादग्रस्त जागेचा कब्जा घेण्यासाठी दोन आठवड्यापूर्वी मध्यरात्री शंभर ते दिडशे जणांच्या जमावा सोबत येऊन चार जेसीबीच्या सहाय्याने दहा दुकाने पाडून एक कोटी रुपयांचे नुकसान केले. याबाबत पडळकर यांच्यासह दिडशे जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यांत आला आहे. या वादग्रस्त जागेत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तहसीलदार दगडू कुंभार यांनी “जैसे थे” परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत. वादग्रस्त जागा ताब्यात घेऊन दोन्ही गटांना तेथे हालचाली करण्यास मज्जाव करण्यांत आला आहे.

याबाबत तहसिलदार दगडू कुंभार यांच्यासमोर गुरुवारी झालेल्या सुनावणीत पडळकर यांच्या वकिलांनी कागदपत्रे सादर करण्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदत मागितली होती यावर तहसीलदार दगडू कुंभार यांनी कोणालाही मुदतवाढ देण्यास नकार देऊन शुक्रवारी याबाबत निर्णय देणार असल्याचे जाहिर केले. त्याप्रमाणे शुक्रवारी जवळपास रात्री नऊ वाजेपर्यंत चार तास सुनावणी झाली. दोन्ही पक्षकारांनी कागदपत्रे सादर केली आहेत.मात्र सुनावणीस रात्री उशिर झाल्यामुळे निकाल राखून ठेवण्यात आला आहे. याबाबतीत रविवारी निकाल जाहीर होण्याची शक्यता खबऱ्याच्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.

तहसीलदारांच्या निर्णयानंतर सुद्धा दोन्ही बाजूच्या पक्षकारांना पुढील न्यायालयीन लढा उच्च स्तरावर लढावा लागेल असे जाणकार मंडळींच्या चर्चेतून समजते आहे.

Previous Post

Shiv Sena : २८ जिल्हाप्रमुखांमुळे शिंदे गट अडचणीत? ठाकरे गटाचा मोठा आरोप

Next Post

सांगली : चारचाकीच्या धडकेत अंत्यविधीसाठी चाललेल्या ३ महिलांचा मृत्यू..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली : चारचाकीच्या धडकेत अंत्यविधीसाठी चाललेल्या ३ महिलांचा मृत्यू..

सांगली : चारचाकीच्या धडकेत अंत्यविधीसाठी चाललेल्या ३ महिलांचा मृत्यू..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group