पलूस:-दोस्ती पॉवर महाराष्ट्र राज्यच्या वर्धापनदिन निमित्त आयोजित दोस्ती पॉवर ग्रुप, शाश्वत रक्तपेढी सांगली आणि महालक्ष्मी रक्तपेढी कराड यांचे संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर आमनापूर (ता पलूस) येथे उत्साहात आणि जल्लोषात पार पडले. शनिवार दि ७ जानेवारी २०२३ रोजी संस्थापक अध्यक्ष शाहरूख भैय्या संदे व सर्व कार्यकर्त्यांनी शिबिराचे नियोजन नेटक्या पध्दतीने पार पडले . यावेळी ७९५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिरात महिलांनी सुद्धा अतिशय उत्स्फूर्त पणे सहभाग नोंदवला.
सदर रक्तदान शिबिरास जिल्ह्यातील तसेच पलूस तालुक्यातील विविध मान्यवरांनी उपस्थित राहून सदिच्छा देऊन कौतुक केले. यावेळी शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख संजय विभुते, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुभाष मोहिते, विश्वनाथ सूर्यवंशी, आकाराम पाटील,सतिश पाटील, उमेश लाड,सुरेश पाटील, पोपट फडतरे, राजाराम कदम, प्रदीप माने, रोहीत भैय्या दळवी, पै संजय हारुगडे. सांगली जिल्ह्य़ातील व पलूस तालुक्यातील सर्व युवा उद्योजक, विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी, युवा संघटीत मित्र, दोस्ती पॉवर महाराष्ट्र राज्यचे सर्व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी रक्तदात्या लोकांना दोस्ती पॉवर ग्रुप तर्फे एक प्रवाशी बॅग भेट म्हणून देण्यात आली तसेच रक्तदात्यांसाठी लकी ड्रॉ ही ठेवण्यात आला आहे. ज्या रक्तदात्यांनी रक्त दिलं त्यांना एक कुपण देण्यात आलं आहे ते कुंपण एक बंदिस्त खोक्यात टाकण्यात आले आहे. त्याचा लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. तो रविवारी संध्याकाळी ७ वाजता काढण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकासाठी स्मार्ट फोन (मोबाइल) , दुसऱ्या क्रमांकासाठी शिलाई मशीन आणि तिसऱ्या क्रमांकासाठी स्मार्ट वाच देण्यात येणार आहे.

