• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

जिल्ह्यातील १९ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ; जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. बसवराज तेली यांनी काढले आदेश.

Admin by Admin
January 4, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
जिल्ह्यातील १९ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ; जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. बसवराज तेली यांनी काढले आदेश.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी /सांगली जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक पदावरील तब्बल १९ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली
यांनी याबाबतचे आदेश बुधवारी दिले आहेत.

पोलिस निरीक्षक अरविंद बोडके यांची नियंत्रण कक्षातून सुरक्षा शाखेकडे बदली करण्यात आली आहे. मुख्यालय उपअधीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे देण्यात आला आहे. सुधीर भालेराव यांची नियंत्रण कक्षातून जिल्हा विशेष शाखेकडे बदली करण्यात आली आहे. तर दहशतवाद विरोधी पथकाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांना देण्यात आला आहे.

तर सहायक पोलीस निरीक्षक गजानन कांबळे यांची शहरकडून जिल्हा विशेष शाखेत, प्रवीण साळुंखे यांची इस्लामपूरहुन पलूसचे प्रभारी म्हणून, अनिल जाधव यांची इस्लामपूरहुन जतला बदली करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे युवराज सरनोबत यांची कुंडलचे प्रभारी म्हणून तर मिरज शहरकडील नितीन सावंत यांची भिलवडीचे प्रभारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

भिलवडीचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांची वाचक म्हणून, जतचे महेश मोहिते यांची कोकरूडचे प्रभारी म्हणून तर विश्रामबाग येथील सिकंदर वर्धन यांची आटपाडीला, कोकरूडचे प्रभारी ज्ञानदेव वाघ यांची आर्थिक गुन्हे शाखेकडे, जतचे विनोद कांबळे यांची सांगली शहरकडे, नियंत्रण कक्षाकडील सागर वरुटे यांची इस्लामपूर येथे बदली करण्यात आली आहे.

शिराळा येथील उपनिरीक्षक अविनाश वाडेकर यांची मिरज शहरकडे, संजयनगरचे महेश डोंगरे यांची शिराळा, महात्मा गांधी ठाण्याकडील सोमनाथ कचरे यांची कवठे- महांकाळला, दीपक सदामते यांची आष्टा येथून संजयनगर, सागर पाटील यांची सांगली ग्रामीण कडून मिरज शहरकडे, जगन्नाथ पवार यांची मिरज शहरकडून इस्लामपूर येथे बदली करण्यात आली आहे.

Previous Post

ब्रेकिंग : महावितरणचा संप मागे; उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीला यश..!

Next Post

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रमुख कवाडे व मुख्यमंत्री  शिंदे निवडणूक लढवणार एकत्रित ; पत्रकार परिषदेत केली युतीची घोषणा.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रमुख कवाडे व मुख्यमंत्री  शिंदे निवडणूक लढवणार एकत्रित ; पत्रकार परिषदेत केली युतीची घोषणा.

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रमुख कवाडे व मुख्यमंत्री  शिंदे निवडणूक लढवणार एकत्रित ; पत्रकार परिषदेत केली युतीची घोषणा.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group