• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत दारूच्या नशेत परशाने फोडली बापूच्या डोक्यात फरशी ; नशेखोर तरुणाला ताब्यात घेतले, जखमीवर उपचार सुरू.

Admin by Admin
January 2, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
जयंतरावांना एकनाथ शिंदे सरकारचा आणखी एक धक्का ; “जिल्हा मध्यवर्ती बँकेतील…….!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी/ शहरातील साठे चौकापासून जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये दारु पित असताना अचानकच दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वादाची ठिणगी एवढी जोरात होती की, मंगळवेढा येथील ऊसतोड मजुर बापू मेटकरी याच्या डोक्यात फरशी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. हल्ल्यात संबंधीत व्यक्ती जखमी झाल्याने त्याला मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती मिळताच मिरज शहर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परशा नामक नशेखोरास ताब्यात घेतले आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

घटनास्थळावरुन मिळालेली अधिक माहिती अशी, संबंधीत जखमी व्यक्ती सोमवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास अण्णाभाऊ साठे चौका जवळील एका हॉटेलमध्ये दारु पिण्यासाठी आला होता. याच हॉटेलमध्ये परशा नामक नशेखोरही दारु पित बसला होता. परशा याने दारुच्या नशेत बापूच्या खिशात हात घालून पैसे काढून घेण्याचा प्रयत्न करीत होता. यावेळी बापू आणि परशा या दोघांमध्ये बाचाबाची झाली. दोघेही भांडत एकमेकांना शिवीगाळ करत हॉटेलच्या बाहेर आले. यावेळी एकमेकांवर धावून जात असताना परशा याने हॉटेलसमोर असलेली ब्लॉकची फरशी घेऊन बापू याच्या डोक्यात मारली. त्यामुळे प्रचंड रक्तस्त्राव होऊन संबंधीत तरुण जखमी झाला.

याबाबत माहिती मिळताच मिरज शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी तरुणास तातडीने मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. संशयीत हल्लेखोर परशा नामक नशेखोरास ताब्यात घेतले. घटनास्थळाचा पंचनामा करुन चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Previous Post

नेवरीत पाणी उशाला मात्र कोरड घशाला

Next Post

पोलिसांसोबत धक्काबुक्की, घातली हुज्जत.. दोघांवर गुन्हा दाखल.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पोलिसांसोबत धक्काबुक्की, घातली हुज्जत.. दोघांवर गुन्हा दाखल.

पोलिसांसोबत धक्काबुक्की, घातली हुज्जत.. दोघांवर गुन्हा दाखल.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group