• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

नेवरीत पाणी उशाला मात्र कोरड घशाला

सहा दिवस झाले पाणीपुरवठाच नाही

Admin by Admin
January 2, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
नेवरीत पाणी उशाला मात्र कोरड घशाला
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

प्रशासनाच्या भोंगळ कारभाराने सर्वसामान्य जनता हैराण

कडेगाव:- कडेगाव तालुक्यातील नेवरी गावालगत येरळा नदी असताना शिवाय पात्रात कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आणि त्यात मुबलक पाणीसाठा असताना गावातील कित्येक प्रभागांमध्ये गेल्या सहा दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही त्यामुळे गावात पाणी उशाला मात्र कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाचे म्हणणे आहे की पाणीपुरवठा विहिरीवरील विदुयत पंपात बिघाड झाला आहे मात्र प्रत्यक्षात येरळा नदी पात्रातून आणि गावालगत असणाऱ्या विहिरीतून गावाला पाणीपुरवठा केला जातो मग विदुयत पंप एक ठिकाणचा बिघडला असेल तर दुसरीकडून पाणीपुरवठा का केला का केला जात नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे तर प्रशासनाच्या भोंगळ कारभाराने सर्वसामान्य जनता मात्र हैराण झाली आहे.

ताकारी व टेंभू सिंचन योजनांच्या माध्यमातून येरळानदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधा-यात बारमाही पाणी सोडले जाते. मात्र पाणी पुरवठा कर्मचा-यांच्या मनमानी कारभारामुळे आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाने ग्रामस्थांना पाण्यासाठी चार चार दिवस वंचित राहावे लागत आहे. भरपूर पाणी असताना गावात प्रत्येक प्रभागात चार दिवसांतुन एकदा पाणीपुरवठा केला जातो. यामुळे ग्रामस्थांची पाणी उशाला व कोरड घशाला अशी अवस्था झाली आहे. त्यात पाणीपुरवठा कर्मचारी सर्वसामान्य जनतेशी व्यवस्थित बोलत नाहीत, पाणीपुरवठयाची माहिती व्यवस्थित देत नाहीत त्यांच्यावर कोणाचाही दबाव नाही. प्रशासनाच्या या भोंगळ कारभारात सर्वसामान्य जनता मात्र नाहक भरडली जात आहे.गटविकास अधिकाऱ्यांनी या पाणीपुरवठा गोंधळ कारभाराची सखोल चौकशी करून गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

गावामध्ये सार्वजनिक पाणीपुरवठा वितरण व्यवस्था कालबाह्य झाली आहे , या कालबाह्य यंत्रणामुळे ग्रामपंचायतीला मिळणारी वसुली या दुरूस्तीवरच जास्त खर्च होत असल्याचं दिसत आहे. प्रशासनाने वेळेत योग्य ती पावले उचलून पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी होत आहे.

Previous Post

इस्लामपूरची वाहतूक शाखा जिल्ह्यात अव्वल!

Next Post

मिरजेत दारूच्या नशेत परशाने फोडली बापूच्या डोक्यात फरशी ; नशेखोर तरुणाला ताब्यात घेतले, जखमीवर उपचार सुरू.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जयंतरावांना एकनाथ शिंदे सरकारचा आणखी एक धक्का ; “जिल्हा मध्यवर्ती बँकेतील…….!”

मिरजेत दारूच्या नशेत परशाने फोडली बापूच्या डोक्यात फरशी ; नशेखोर तरुणाला ताब्यात घेतले, जखमीवर उपचार सुरू.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group