• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सातारा | कंटेनरवर दुचाकी आदळून दोन युवकांचा मृत्यू .

Admin by Admin
January 1, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सातारा | कंटेनरवर दुचाकी आदळून दोन युवकांचा मृत्यू .
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सातारा : पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातारा शहरानजिक खिंडवाडी (ता. सातारा) येथे भरधाव दुचाकी कंटेनरला पाठीमागून धडकून दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झाला.

आदेश विलास साळुंखे (वय २१) सध्या रा. नागठाणे, ता. सातारा),पारस संभाजी डफळे (वय १६, रा. वजरोशी ता. पाटण) अशी अपघातात ठार झालेल्या तरूणांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की नागठाणेहून आदेश साळुंखे व पारस डफळे दुचाकीवरून गाडीची बॅटरी बदलण्यासाठी साताऱ्यात येत होते.

त्यावेळी खिंडवाडीजवळ पुढे निघालेल्या कंटेनरला पाठीमागून दुचाकी जोरदार धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, आदेश साळुंखेचा जागीच मृत्यू झाला तर पारस हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

आदेश साळुंखे हा एका अॅकडमीमध्ये सैन्य दलात भरती होण्यासाठी नागठाणे येथे सराव करत होता. तर पारस हा पंजाब येथे इंजिनिअरींगचे शिक्षण घेत होता. तो दोन दिवसांपूर्वी गावी आला होता. मित्रासोबत जाताना त्याच्यावरही काळाने घाला घातला. या अपघाताची सातारा शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.

Previous Post

खंडणीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल.

Next Post

देशाला हिंदू राष्ट्र घोषित करा ; कोल्हापूरकरांची मागणी : जन आक्रोश मोर्चा.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
देशाला हिंदू राष्ट्र घोषित करा ; कोल्हापूरकरांची मागणी : जन आक्रोश मोर्चा.

देशाला हिंदू राष्ट्र घोषित करा ; कोल्हापूरकरांची मागणी : जन आक्रोश मोर्चा.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group