• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

साताऱ्यात गुंडांकडून पोलिसांना मारहाण; ताब्यात घेतल्यानंतरही दोघांचे पलायन

Admin by Admin
January 1, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
साताऱ्यात गुंडांकडून पोलिसांना मारहाण; ताब्यात घेतल्यानंतरही दोघांचे पलायन
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सातारा : खबऱ्या प्रतिनिधी : साताऱ्यात फौजदारासह पोलिसाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. शिवराज पेट्रोल पंप परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला असून ताब्यात घेतलेल्या संशयितांपैकी दोघांनी पलायन केले आहे.

दरम्यान, सराईत गुन्हेगार अक्षय पवार (रा. रविवार पेठ, सातारा) याला मात्र पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संतोष ज्ञानोबा शेलार (वय ३८, रा. खेड, ता. सातारा) असे हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिसाचे नाव असून त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार पोलिस संतोष शेलार हे शुक्रवारी मध्यरात्री रात्र गस्तीसाठी तैनात होते. त्यांच्यासोबत फौजदार वाघमोडे होते. रात्री दीड वाजता दोन्ही पोलिस शिवराज पेट्रोल पंप परिसरातील एका हॉटेलजवळ गेले असता तेथे काहीजण गोंधळ घालत होते. दोन्ही पोलिसांनी संबंधितांना शांततेचे आवाहन करुन तेथून निघून जाण्यास सांगितले. मात्र, संशयित अक्षय पवार व त्याच्या दोन्ही साथीदारांनी पोलिसांना शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली. पोलिसांना उद्देशून ‘आम्ही कोण आहे? तुम्हाला सोडणार नाही.’ असे म्हणत धमकी दिली. यावेळी एका संशयिताने तक्रारदार पोलिस यांना थेट धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली.

घटनेचे गांभिर्य ओळखून फौजदार वाघमोडे यांनी पोलिस ठाण्याला फोन करून अधिक कुमक मागवली. तोपर्यंत एका संशयिताने फौजदार यांनाही धक्काबुक्की करत तक्रारदार शेलार यांच्या डोळ्यावर दुचाकीच्या चावीने हल्ला केला. यामध्ये ते जखमी झाले. पोलिस व संशयितांमध्ये सुमारे १५-२० मिनीटे झटापट सुरु होती. ही घटना घडत असतानाच मदतीसाठी पोलिसांची दुसरी व्हॅन आली. सर्व पोलिसांनी संशयितांची धरपकड करुन त्यांना पोलिस व्हॅनमध्ये बसवले. तरीही संशयित सर्व पोलिसांना शिवीगाळ व दमदाटी करत होते.

पोलिस व्हॅन शहर ठाण्यासमोर आल्यानंतर दोन संशयितांनी पोलिसांसमोरच पलायन केले. दरम्यान, जखमी पोलिस संतोष शेलार यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी पहाटे संशयितांवर शासकीय कामात अडथळ्यासह विविध विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

Previous Post

थर्टी फर्स्ट ला नशेचा ओव्हरडोस, तब्बल एक कोटींचा ड्रग्स जप्त ; १६ नायजेरियन ताब्यात.

Next Post

फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, तीन कामगार ठार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, तीन कामगार ठार

फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, तीन कामगार ठार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group