मिरज : खबऱ्या प्रतिनिधी / वर्षाअखेरीस मिरज शहर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आपल्या अनोख्या कौशल्याने २४ तासांच्या आत ट्रॅक्टर चोरट्याच्या मुस्क्या आवळण्यात शहर पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिनांक २८ डिसेंबर रोजी म्हैसाळ रोडवरील मंडले यांच्या वीट भट्टीवरून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ट्रॅक्टर चोरल्याची तक्रार महेश मंडले यांनी दिली होती. पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केल्यानंतर २४ तासांच्या आतच आरोपी जमीर सय्यद अलगुंडी (वय २३ वर्षे) रा.नागराळ ता. विजापूर सध्या राहणार म्हैसाळ रोड मंडले वीटभट्टी मिरज याच्या मुस्क्या आवळल्या आहेत.
महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर व ट्रॉली असा ८ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या नेतृत्वात, विष्णू काळे, पृथ्वी कांबळे, सचिन सनदी, नागेश मासाळ, गजानन बिरादार व दीपक परीट यांनी केली.

