• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

धर्मांतर, चर्च बांधकाम प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांची विधानसभेत लक्षवेधी.

Admin by Admin
December 29, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
धर्मांतर, चर्च बांधकाम प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांची विधानसभेत लक्षवेधी.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आटपाडी, खबऱ्या प्रतिनिधी : आटपाडी येथे संजय गेळे आणि त्याची पत्नी अश्विनी हे दोघे लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना आमिष दाखवून धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत आहेत.

त्यांनी आटपाडी येथे बेकायदा चर्च बांधले आहे. वरद हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागातील अश्विनी जिरे या मुलीच्या डोक्यावर हात ठेऊन संजय आणि अश्विनी गेळे या दोघांनी प्रार्थना म्हणल्याची घटना घडली. या प्रकरणी जादूटोणा आणि भोंदूगिरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

या घटनेनंत्तर हिंदू समाज बांधवांमध्ये मोठी नाराज आहे. शुक्रवारी (दि.३०) हिंदू समाज बांधवांकडून एस. टी. स्टॅन्ड ते तहसिल कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहेत. त्यामुळे धर्मांतर करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि बेकायदा चर्चचे बांधकाम काढून टाकावे. गेळे कुटुंबियांच्याकडे आलिशान हॉटेल, जेसीबी आणि पोकलॉड मशीन आणि अनेक ठिकाणी जमिनी अशी संपत्ती आहे. ती कशी आली याची चौकशी करावी आणि कारवाई करावी, अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

याबाबत लोकभावना अत्यंत तीव्र आहेत. कारवाई न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारा देत शासनाने लक्ष द्यावे असा प्रश्न पडळकर यांनी विधानसभेत मांडला. या लक्षवेधी वर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेळे कुटुंबाच्या मार्फत होणारे धर्मांतर आणि चर्चच्या बांधकामाबाबत शासनामार्फत चौकशी करून कारवाई करण्याची ग्वाही दिली.

Previous Post

मोठी बातमी CBSE १० वी,१२ वी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, पहा संपूर्ण वेळापत्रक…

Next Post

सैराट वन्स अगेन !: औरंगाबाद पुणे महामार्गावरील ईसारवाडी फाट्यावर भर रस्त्यात भाऊजींचा कुऱ्हाडीने खून करून जल्लोष! ; जिल्हा हादरला !

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सैराट वन्स अगेन !: औरंगाबाद पुणे महामार्गावरील ईसारवाडी फाट्यावर भर रस्त्यात भाऊजींचा कुऱ्हाडीने खून करून जल्लोष! ; जिल्हा हादरला !

सैराट वन्स अगेन !: औरंगाबाद पुणे महामार्गावरील ईसारवाडी फाट्यावर भर रस्त्यात भाऊजींचा कुऱ्हाडीने खून करून जल्लोष! ; जिल्हा हादरला !

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group