• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

रामापूरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पोची ऊस ट्रॉलीला धडक

वांगी येथील युवक गंभीर जखमी कडेगाव तालुक्यातील अवैध वाळू तस्करीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर महसूल प्रशासन करतंय तरी काय ?

Admin by Admin
December 29, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
रामापूरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पोची ऊस ट्रॉलीला धडक
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कडेगाव:- कडेगाव तालुक्यातील अवैध वाळू तस्करी हा आता घातकी मुद्दा बनत चालला असून महसूल प्रशासन यावर काही केल्या उपाय करण्यास तयार नसल्याचं दिसून येत आहे. रामापूर येथे अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या टेम्पो ने बुधवारी रात्री ९ च्या सुमारास ऊस भरून थांबलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडक दिल्याची गंभीर घटना घडली आहे. यामध्ये वांगी ता कडेगाव येथील युवक गंभीर जखमी झाला असून अपघातामध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा पुढचा भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. तर ट्रॅक्टर ट्रॉलीची धडी पूर्णपणे निकामी झाली आहे.

हा अपघात रात्री ९ च्या सुमारास झाला आहे आणि यावेळी टेम्पो अवैध वाळूने भरलेला होता म्हणजे कडेगाव तालुक्यात अवैध वाळू तस्करी किती वाजता सुरू होते आणि प्रशासन नक्की काय करतंय ? याचा विचार न केलेला बरा. याबाबत घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की , वांगी येथील दोघेजण अवैध वाळूने भरलेला टेम्पो घेऊन वांगी तुन रामापूर मार्गे इतरत्र घेऊन चालले असताना रामापूर मध्ये ऊस भरून रस्त्याकडेला थांबलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून सदर टेम्पोची धडक बसली. यात टेम्पो मधील एक युवक गंभीर जखमी झाला आहे तर दुसरा किरकोळ. अपघातामध्ये टेम्पोचा पुढचा भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे तर ट्रॉलीची धडी निकामी झाली आहे. अपघात स्थळी लोकांनी गर्दी केली होती. घटनेची माहिती समजताच चिंचणी वांगी पोलीस ठाण्याचे अधिक वनवे घटनास्थळी दाखल झाले.

अपघातामध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अक्षरशः चुराडा झाला..

या अपघातावरून कडेगाव तालुक्यातील अवैध वाळू तस्करी खुले आम सुरू असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झालं असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर कठोर पावले उचलावीत अशी मागणी होत आहे.

Previous Post

नीरा नदीत उडी मारून २४ वर्षीय युवतीचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न…

Next Post

कोल्हापूर व सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक “या” समितीचे सदस्य

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली शहर पोलिसांची धडक कारवाई ; रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेली रत्नागिरीची “ती” महिला ताब्यात..!

कोल्हापूर व सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक "या" समितीचे सदस्य

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group