गौण खनिजासंदर्भात कारवाई करताना कर्तव्यात कसूर केल्याने कर्जतचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले व तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निलंबित करण्यात आले आहे. विधिमंडळाच्या नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे कर्जत व जामखेड तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कर्जत तालुक्यातील माळढोक अभयारण्यासह कर्जत, जामखेड तालुक्यातील पर्यावरणाची हानी होत असल्याने महसूल प्रशासनाने दोन्ही तालुक्यांतील खडीक्रशर बंद ठेवले होते; परंतु काही दिवसांपूर्वी प्रांताधिकाऱयांनी या खडीक्रशरवर कारवाई करत लाखो रुपयांचा दंड ठोठावण्याची कारवाई केल्याने खडीक्रशर सुरूच असल्याचे समोर आले. याच अनुषंगाने दोषी प्रांताधिकारी व तहसीलदारांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार प्रा. राम शिंदे यांनी विधान परिषदेत केली होती.

