• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | मनसे जिल्हाध्यक्षासह १६ जणांवर गुन्हा दाखल

Admin by Admin
March 28, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
ब्रेकिंग | मनसे जिल्हाध्यक्षासह १६ जणांवर गुन्हा दाखल
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

म्हसवड; खबऱ्या प्रतिनिधी : वाकी ता. माण येथे माणगंगा नदीतून वाळू उपसा करून व ती चोरून नेण्याचा प्रयत्न महसूल विभागाने हाणून पाडला. मात्र त्यानंतर याबाबत गुन्हा दाखल होऊ नये, कोणतीही कारवाई होऊ नये यासाठी मनसेचा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कट्टे- पाटील याच्यासह काही जणांनी सेटलमेंटसाठी धडपड केली.

दरम्यान, वाळू चोरी (Sand theft case) व सेटलमेंटचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकूण 14 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. धैर्यशील कट्टे-पाटील (रा. गोंदवले बु.), हणमंत सावंत (रा.दिवड) यांच्यासह अनोळखी १६ जणांवर गुन्हा दाखल दाखल झाला आहे.

मंडलाधिकारी सुनील खेडेकर यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. अधिक माहिती अशी, वाळू चोरीबाबतची घटना दि. 22 रोजी वाकी गावच्या हद्दीतील माणगंगा नदीपात्रात घडली आहे. तक्रारदार मंडलाधिकारी यांना माणगंगा नदी पात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे महसूल विभागाने पथक तयार करुन दि. 22 रोजी वाकी येथे धाड टाकली. महसूल कर्मचार्‍यांना पाहिल्यानंतर वाळू उपसा करणार्‍या ट्रॅक्टर चालकासह इतरांनी वाळू तेथेच ओतून ट्रॅक्टर घेवून तेथून पळ काढला. महसूल विभागाने घटनास्थळाचा पंचनामा करुन कारवाईला सुरुवात केली. (Sand theft case)

या घटनेची माहिती संबंधित संशयित आरोपींना समजल्यानंतर त्यांनी कारवाई करण्यास मज्जाव केला. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. चर्चा करुनही महसूलचे कर्मचारी ऐकत नसल्याने तणातणी झाली. मात्र, अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.

Previous Post

एकदा नाही, दोनदा नाही,पडळकरांनी तीनदा करून दाखवलं, आणि सरकार बघत राहिलं..?

Next Post

पीएसआय गुणवत्ता यादीला आव्हान, नव्या नियमाने अडचण

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पीएसआय गुणवत्ता यादीला आव्हान, नव्या नियमाने अडचण

पीएसआय गुणवत्ता यादीला आव्हान, नव्या नियमाने अडचण

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group