• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज : धक्कादायक | मारहाण करून तरुणाला इलेक्ट्रिक शॉक.

Admin by Admin
November 29, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरज : धक्कादायक | मारहाण करून तरुणाला इलेक्ट्रिक शॉक.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज; खबऱ्या प्रतिनिधी : पायाप्पाचीवाडी (ता. मिरज) येथे मुलीचे फोटो मोबाईलमध्ये ठेवल्याने व तिला भेटल्याच्या कारणातून एकाला बेदम मारहाण करून इलेक्ट्रिक शॉक देण्याचा प्रकार घडला.

सूरज संजय कदम (वय 26, रा. डोंगरवाडी, ता. मिरज) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी सूरज याने विठ्ठल वसंत कदम (वय 40, रा. डोंगरवाडी, ता. मिरज) आणि गणेश पाटील (वय 35, रा. आरग, ता. मिरज) व अन्य चौघांविरुद्ध पोलिसांत फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सूरज कदम हा तरुण गुरुवारी (दि. 24) रात्री डोंगरवाडी येथून निघाला होता. त्यावेळी वरील संशयितांनी त्याला गाठले. संशयितांनी सूरज याला जरा काम आहे चल, असे म्हणून मोटारसायकलवरून बसवून पायाप्पाचीवाडी कॅनॉलजवळ घेऊन गेले. त्या ठिकाणी संबंधित मुलीचे फोटो तुझ्या मोबाईलमध्ये ठेवायचे नाही, तसेच तिला भेटायचे नाही, असे म्हणून संशयितांनी सूरज याला उसाने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर इलेक्ट्रीक बॅटरीने सूरज याच्या पाठीत शॉक देऊन गंभीर जखमी केले असल्याचे त्याने दिलेल्या फियादीत म्हटले आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Previous Post

“…. अन्यथा महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करू” ; मिरज शहर परिवर्तन समिती आक्रमक..!

Next Post

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र ऑफलाईन सादर करण्याची मुभा-राज्य निवडणूक आयुक्त

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मुख्यमंत्री शिंदेंचं शंभूराज देसाई, पृथ्वीराज चव्हाणांकडून स्वागत

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र ऑफलाईन सादर करण्याची मुभा-राज्य निवडणूक आयुक्त

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group