• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कडेगाव महसूलमध्ये अजूनही जबाबदार अधिकारी आहेत

नायब तहसीलदार बडबडेंकडून सेतूची झाडाझडती

Admin by Admin
November 22, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, माफ करा स्पष्ट बोलतो
1 min read
0
वाळू तस्कर जोमात तहसील प्रशासन कोमात
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बेशिस्त आणि उद्धट कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवा जनतेतून मागणी..

कडेगाव:- “कडेगाव च्या सेतूचा कारभार रामभरोसे” सामाजिक माध्यमातील निव्वळ या मेसेज वरून प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार बडबडे यांनी तात्काळ सेतू कार्यालयास भेट देऊन झाडाझडती घेतली आणि कारभार व्यवस्थित चालवण्याच्या सूचना दिल्या. मात्र सेतू कार्यालयातील काही कर्मचारी अतिशय बेशिस्त आणि उद्धट वागत असून याबाबत सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे सेतू चालकाने अशा कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करून त्यांना घरचा रस्ता दाखवावा अशी मागणी जनतेतून होत आहे.

कडेगावच्या सेतू कार्यालयातील काही कर्मचारी सर्वसामान्य जनतेशी अतिशय बेशिस्त पणे आणि उद्धटपणे वागत असतात याबाबत अनेकदा तक्रारी सुद्धा झाल्या आहेत,मात्र सगळे याकडे दुर्लक्ष का करीत होते समजत नव्हते. सध्या ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. इच्छुक उमेदवार वेगवेगळ्या दाखल्यांसाठी तालुक्याला सेतू मध्ये हेलपाटे मारत आहेत मात्र याठिकाणी काम करणारे काही उद्धट कर्मचारी लोकांना अतिशय हीन वागणूक देताना दिसत आहेत. लोकांना उद्धट बोलणे, व्यवस्थित माहिती न देणे, दाखल्यांसाठी टोकन वितरित न करणे, ज्यादा रक्कम आकारणी करणे अशा अनेक बाबी समोर येऊ लागल्या.

याबाबत समाज माध्यमामध्ये “कडेगावच्या सेतू कार्यलयाचा कारभार रामभरोसे, अधिकारी लक्ष घालणार की नाही? असा मेसेज पडताच प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार बडबडे यांनी तात्काळ सेतू कार्यालयास भेट देऊन झाडाझडती घेत कारभार सुधारण्याच्या सूचना दिल्या. मात्र कारभार सुधारेल अशी आशा व्यक्त करणे चुकीचे असून याठिकाणी बेशिस्त आणि उद्धट वागणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवावा अशी मागणी होत आहे.

Previous Post

शिंदे गटातील आमदार कसे फोडले? राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितला ५० कोटींचा विषय…

Next Post

सूरज जगताप यांनी केले सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सूरज जगताप यांनी केले सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व

सूरज जगताप यांनी केले सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group